जळगावातूनही तयार होताहेत "आयर्नमॅन' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

जळगाव ः पूर्वीच्या तुलनेत धावणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामुळे लहान शहरांमधूनही उत्कृष्ट धावपटू तयार होत आहेत. धावण्यासाठी जे पोषक वातावरण आवश्‍यक आहे, ते तयार होत असल्याने शहरामध्येही मॅरेथॉन स्पर्धा भरविली जात आहे. याच वातावरणामुळे जळगाव शहरातून "आयर्नमॅन' घडत आहेत. 

जळगाव ः पूर्वीच्या तुलनेत धावणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामुळे लहान शहरांमधूनही उत्कृष्ट धावपटू तयार होत आहेत. धावण्यासाठी जे पोषक वातावरण आवश्‍यक आहे, ते तयार होत असल्याने शहरामध्येही मॅरेथॉन स्पर्धा भरविली जात आहे. याच वातावरणामुळे जळगाव शहरातून "आयर्नमॅन' घडत आहेत. 
जळगाव "रनर्स ग्रुप'तर्फे "खानदेश रन' मिनी मॅरेथॉन भरविण्यात आली आहे. मॅरेथॉनमुळे निश्‍चितच जळगावातील धावण्याचे "कल्चर' वाढले आहे. यासोबत अनेकांनी सायकलिंग आणि स्वीमिंगची देखील सवय स्वतःला लावून घेतली आहे. या तीनही खेळांमधून होणाऱ्या "ट्रायथलॉन' स्पर्धेत सहभागी होऊन निश्‍चित वेळेत "टारगेट' पूर्ण केल्यानंतर "आयर्नमॅन' होण्याचा मान मिळत असतो. अशीच इंडोनेशिया येथे झालेली स्पर्धा पूर्ण करून खानदेशातून पहिले आयर्नमॅन होण्याचा बहुमान स्वप्नील मराठे आणि निशी माधवानी यांनी मिळविला आहे. यानंतर ऑक्‍टोबरमध्ये विक्रांत सराफ, डॉ. विवेक पाटील आणि प्रा. शशांक झोपे यांनी गोवा येथे झालेली स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत "आयर्नमॅन' ठरले. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing, sky and outdoor

जळगावचा झेंडा 
"आयर्नमॅन' होण्याचा मार्ग तसा सोपा नाही. यात सहभागी होणाऱ्यांना स्पर्धेतील स्वीमिंग 1.9 किलोमीटर, सायकलिंग 90 किलोमीटर आणि रनिंग 21 कि.मी. अंतर एका पाठोपाठ एक दिलेल्या वेळेत पूर्ण करावयाचे असते. यासाठी तितकी मेहनत देखील आवश्‍यक असते. म्हणजेच "आयर्नमॅन' हे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातूनच तयार होत असतात, असे म्हटले जाते. परंतु आता जळगावला देखील हा बहुमान रनर्स ग्रुपमुळे मिळाला आहे. जळगावातून आतापर्यंत पाच "आयर्नमॅन' झाले आहेत. 
 
पहिले आयर्नमॅन म्हणतात... 

Image may contain: 1 person, close-up
इंडोनेशिया येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी होऊन "आयर्नमॅन' ठरलो. यासाठी आवश्‍यक असते सायकलींग, रनिंग आणि स्वीमिंग. 2016 पासून सायकलिंग करण्यास सुरवात होती. यानंतर रनर्स ग्रुपशी जुळल्यानंतर धावण्याचा सराव सुरू केला. "रनर्स ग्रुप'चा सपोर्ट देखील तितकाच चांगला राहिला. इंडोनेशिया येथील स्पर्धा 8 तास 8 मिनिटांत पूर्ण करू शकल्याचा आनंद आहे. 
- स्वप्नील मराठे, "आयर्नमॅन' तथा सदस्य रनर्स ग्रुप. 

 

Image may contain: 1 person, smiling, beard and close-up
इंडोनेशिया येथील स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी औरंगाबादला झालेल्या ऑलिपिंक डिस्टनच्या "ट्रायथलॉन' स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच दोन मॅरेथॉन धावल्यानंतर इंडोनेशिया येथील स्पर्धेसाठी नोंदणी केली. तसा सराव देखील केला. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर थोड्या अडचणी आल्या. पण न खचता 8 तास 28 मिनिटांत तीनही प्रकारातील स्पर्धा पूर्ण करून "आयर्नमॅन'चा मान पटकावला. 
निशी माधवानी, आयर्नमॅन तथा सदस्य रनर्स ग्रुप. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khandesh run mini marethon jalgaon run group aarynman