"मिनी मॅरेथॉन'मध्ये धावणार एक हजार महिला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

जळगावः धावणे आरोग्यासाठी फलदायी मानले जाते. यामुळे सकाळी-सकाळी नियमित धावणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. पण यात बहुतांशी अधिक प्रमाण हे पुरुषांचेच असते. महिलांची संख्या मात्र फार कमी पाहावयास मिळते. मात्र, यंदाच्या खानदेश रन मिनी मॅरेथॉनमध्ये एकूण सहभागी स्पर्धकांपैकी एक तृतीयांश संख्या ही महिलांची आहे. स्पर्धेतील चारही गटांमधून जवळपास एक हजार महिला व मुली धावणार आहेत. 

जळगावः धावणे आरोग्यासाठी फलदायी मानले जाते. यामुळे सकाळी-सकाळी नियमित धावणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. पण यात बहुतांशी अधिक प्रमाण हे पुरुषांचेच असते. महिलांची संख्या मात्र फार कमी पाहावयास मिळते. मात्र, यंदाच्या खानदेश रन मिनी मॅरेथॉनमध्ये एकूण सहभागी स्पर्धकांपैकी एक तृतीयांश संख्या ही महिलांची आहे. स्पर्धेतील चारही गटांमधून जवळपास एक हजार महिला व मुली धावणार आहेत. 
"खानदेश रन'ला अवघे काही दिवस राहिले आहे. यामुळे स्पर्धेत सहभागी स्पर्धकांसह आयोजकांच्या तयारीला वेग आला आहे. स्पर्धा आयोजनाच्या भूमिकेत महिला देखील असून, आतापर्यंत महिला स्पर्धकांकडून सराव करून घेण्यापासून आता स्पर्धेच्या दिवशी मिळालेली जबाबदारी पार पाडण्यापर्यंत महिलांची ऑर्गनायझर कमिटी तयार आहे. जळगावात खानदेश रनमधून पुरुष महिलांचा सहभाग राहत असला तरी; केवळ महिलांसाठी आयोजित होणाऱ्या "पिंकेथॉन' या स्पर्धेला देखील तितकाच प्रतिसाद महिलांचा लाभत आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या पिंकेथॉन स्पर्धेतून 650 महिला धावल्या होत्या. तर आता खानदेश रनमधून एक हजार महिला धावताना पाहावयास मिळणार आहेत. 

लहान गटातून अधिक स्पर्धक 
"खानदेश रन मॅरेथॉनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून 3 हजार 400 स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. या स्पर्धकांमध्ये एक हजार स्पर्धक या महिला व मुली आहेत. यामुळे रनमध्ये पुरुषांसोबत धावणाऱ्या महिलांची संख्या देखील अधिक पाहण्यास मिळेल. या रनमधील लहान गट म्हणजे 3 आणि 5 किलोमीटर अंतराच्या रनमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. तरी देखील 21 कि.मी. रनमध्ये 12 महिला, 10 कि.मी.च्या रनमध्ये 85 महिलांनी सहभाग नोंदविला आहे. उर्वरित 903 महिला व मुली या तीन व पाच कि.मी. अंतराच्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. 

जळगावात रविवारी होत असलेल्या "खानदेश रन'मध्ये धावण्यात सहभाग नसून, आयोजन समितीमध्ये आहे. यामुळे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांपासून मॅरेथॉनमध्ये धावत असून आतापर्यंत मुंबई येथील दोन पिंकेथॉन आणि नागपूरची एक पिंकेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. खानदेश रनमध्ये सहभागी स्पर्धकांसाठी स्पेशल सेशन घेतले; महिलांसाठी देखील सेशन असायचे. धावणे आरोग्यासाठी चांगले असून, यात आई धावली म्हणजे परिवार देखील यासाठी निश्‍चित धावेल. 
- तृप्ती बढे, आयोजन समिती, खानदेश रन. 

धावण्याची निश्‍चितच आवड असल्याने जळगावच नव्हे, तर अकोला आणि पाचगणी या दोन मॅरेथॉनमधून 5 किलोमीटर गटातून सहभाग घेतला आहे. शिवाय जळगावात झालेल्या पिंकेथॉन मॅरेथॉनमध्ये धावले असून, रविवारी होत असलेल्या खानदेश रनमध्ये पती, मुलगा आणि स्वतः 3 किलोमीटर गटातून धावणार आहे. 
- सरिता खाचणे, स्पर्धक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khandesh run mini marethone one thousand woman running