"तो' बंद रस्ता "व्हीआयपीं'साठी 

"तो' बंद रस्ता "व्हीआयपीं'साठी 

"तो' बंद रस्ता "व्हीआयपीं'साठी 

जळगाव ः शहरातील मुख्य बाजारपेठेतील तसेच रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी खानदेश सेंट्रलच्या जागेवरून सार्वजनिक वापरात असलेला रस्ता एका बाजूने गेट लावून बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना हा रस्ता खासगी की सार्वजनिक, असा प्रश्‍न पडला आहे. त्यात जळगाव शहर वाहतूक शाखेचा सार्वजनिक 
वापराचा रस्ता असून, तो वापरावा असे फलक त्यांनी लावला आहे. परंतु वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांबाबत विचारले असता त्यांनी हा रस्ता "व्हीआयपी'साठी बंद केला असल्याचे माहिती दिली. 
रेल्वेस्थानक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या रस्त्याची गर्दी पाहता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकाच्या जुन्या वाहन पार्किंगच्या जागेवरील भिंत पाडून खानदेश सेंट्रल मॉल या खासगी मालमत्तेच्या जागेमधून रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून नेहरू पुतळ्यासमोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी जाळीचे गेट बसवून ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता सार्वजनिक असूनही त्याचा वापर नागरिकांना करता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. हा रस्ता सार्वजनिक असून, तो वापरावा असे नेहरू पुतळा चौकात मोठे शहर वाहतूक शाखेने नागरिकांसाठी सूचनेचे फलक लावले आहे. 

"त्या' रस्त्यावर वाहनांची होते पार्किंग 
नेहरू पुतळ्या चौक तसेच गोविंद रिक्षा स्टॉपकडून जाणारा एका बाजूचा रस्ता हा गेट लावून बंद केला आहे. वाहतूक कोंडी तसेच जेव्हा रस्ता खुला होता तेव्हा तेथे अनावश्‍यक वाहने गाडी बेशिस्त लावण्याचा त्रास वाढला होता. तसेच वाहतूक कोंडीच्या वेळी बंद रस्त्या हा व्हीआयपींना बाहेर काढण्यासाठी जागा मालकाला विनंती करून बंद केला असल्याचे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे. 


बंद केलेला हा रस्ता खुला असता तेथे बेशिस्त वाहने पार्किंग होत होती. त्यात मुख्य रस्त्यावर जेव्हा वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता "व्हीआयपी' वाहनांसाठी पर्याय म्हणून राहावा, यासाठी विनंती करून रस्ता बंद केला आहे. 
 देविदास कुनकर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com