अपहरणाचा संशय येताच दोघींनी केले 'असे' काही.....

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

तेरा वर्षीय सुमन व तिची बहीण मंगल (नाव बदलले आहे) या दोघी वावी येथील नूतन विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकतात. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या वावी-शिर्डी रस्त्यालगत असलेल्या घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी काही वाहनांना हात दाखविला असता एका पिक-अपचालकाने वाहन थांबविले. दोघींना पाठीमागे बसविले. त्यानंतर संशयिताने शिर्डीच्या दिशेने भरधाव पिक-अप चालविला. घराजवळ आल्यानंतर दोघींनी पिक-अपचालकाला आवाज देत वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र तरीही वाहन भरधाव जात असल्याने दोघांनी त्यांच्या पालकांना आवाज दिला. ते पाहून पालकांनी रस्त्याच्या दिशेने धावही घेतली. 

नाशिक : शाळा सुटल्यानंतर घराकडे परतताना दोघी शाळकरी चुलत बहिणींनी पिक-अपला हात केला. पिक-अपचालकाने दोघींना बसविले मात्र घराजवळ पिक-अप न थांबल्याने दोघींपैकी एकीने भरधाव पिक-अपमधून उडी घेतली. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली, तर दुसरीला पिक-अपचालकाने काही अंतरावर सोडून पोबारा केला. ही घटना सोमवारी (ता. 18) दुपारच्या सुमारास घडली आहे. गंभीर जखमी शाळकरी मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

एकीने धावत्या पिक-अपमधून घेतली उडी..दुसरीला काही अंतरावर सोडले,

गंभीर जखमी मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरा वर्षीय सुमन व तिची बहीण मंगल (नाव बदलले आहे) या दोघी वावी येथील नूतन विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकतात. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या वावी-शिर्डी रस्त्यालगत असलेल्या घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी काही वाहनांना हात दाखविला असता एका पिक-अपचालकाने वाहन थांबविले. दोघींना पाठीमागे बसविले. त्यानंतर संशयिताने शिर्डीच्या दिशेने भरधाव पिक-अप चालविला. घराजवळ आल्यानंतर दोघींनी पिक-अपचालकाला आवाज देत वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र तरीही वाहन भरधाव जात असल्याने दोघांनी त्यांच्या पालकांना आवाज दिला. ते पाहून पालकांनी रस्त्याच्या दिशेने धावही घेतली. 

शिर्डी रस्त्यावर शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न 

पिक-अपमधील 13 वर्षीय सुमनने धावत्या वाहनातून बाहेर उडी घेतली. या दुर्घटनेमध्ये तिच्या डोक्‍याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पालकांनी धाव घेत तिला ताब्यात घेत तत्काळ वावीच्या दिशेने निघाले. एकाने संशयित पिक-अपच्या मागे दुचाकीवरून पाठलाग केला, मात्र संशयित चालकाने मिरगाव फाट्यावर मंगलला सोडून पोबारा केला. गंभीर जखमी सुमनला उपचारासाठी तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद केल्यानंतर त्याची माहिती वावी पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत वावी पोलिस अंधारातच होते. माहिती मिळाल्यानंतर वावी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. 

अपहरणाची शक्‍यता...सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर  
या घटनेतून दोघी शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचाच प्रयत्न झाला असावा, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. बहुतांश वेळा वावीतून शाळकरी मुले-मुली वाहनांना हात दाखवितात आणि काही वाहने त्यांना रस्त्यावरील त्यांच्या वस्तीजवळ सोडतात. मात्र अद्यापपर्यंत अपहरणासारखा प्रकार घडलेला नसल्याचे जखमी मुलींच्या पालकांनी सांगितले; परंतु या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of school girls on Shirdi road Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: