PHOTOS : अंधारातून महिलेचा आरडाओरड ऐकू आला...'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

सिम्बॉयोसिस कॉलेज येथून चक्कर मारत असताना एका महिलेचा आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन बघितले असता, दोन जण लपून बसले होते. त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेत फरारी, तर दुसरा संशयित आकाश डोळसे हा हाती लागला.

नाशिक :  घरफोडी प्रयत्नाच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताने 26 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना अबंड पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. संशयितांची रविवारी (ता. 8) रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या गुन्ह्याची अंबड पोलिसांत प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, फरारी झालेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चक्कर मारताना एका महिलेचा आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने.........
छत्रपती सेनेचे चेतन शेलार, नीलेश शेलार व तुषार गवळी हे शनिवारी (ता. 7) रात्री सिम्बॉयोसिस कॉलेज येथून चक्कर मारत असताना एका महिलेचा आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन बघितले असता, दोन जण लपून बसले होते. त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेत फरारी, तर दुसरा संशयित आकाश डोळसे (वय 19) हा हाती लागला. श्री. शेलार यांनी अंबड पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत नागरे, देवेंद्र बर्डे, मुरली जाधव, नितीन फुलमाळी, मारुती गायकवाड यांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयित आकाश याच्या चौकशीत त्याच्याजवळ मोबाईल मिळून आला. मोबाईल हा रमाबाई आंबेडकरनगरातील महिलेचा असल्याचे सांगितले. रविवारी दुपारी संशयित आकाश यास सोबत घेत अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक संबंधित महिलेच्या घरी गेले. त्यावेळी आकाश याने घर दूरनच दाखवित पाय दुखत असल्याचे कारण सांगत दूर थांबला. पोलिस घराकडे जात असल्याचे पाहत आकाश डोंगराकडे पळला. 

हेही वाचा >  PHOTO : ट्रान्स्पोर्टच्या नावाने उचललेला लाखोंचा माल पुण्याला पोहचलाच नाही...तर....

Image may contain: 1 person, closeup

रेखा अवचर 

फरारीचा शोध; अंबडच्या गुन्हे शोध पथकाचा तपास 
हवालदार मारुती गायकवाड, पोलिस नाईक धनंजय दुबाळे व पोलिस शिपाई हेमंत आहेर यांनी त्याचा पाठलाग करीत त्यास पकडले. दरम्यान, बंद असलेले घर पोलिसांनी बघितले असता, त्यात राहणारी रेखा अवचर (वय 26) ही महिला मृतावस्थेत मिळून आली. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार हा प्रेमप्रकरणातून घडला असल्याचा अंदाज अल्याचे सांगितले. गुन्हे शोध पथकाचे हवालदार गायकवाड, भास्कर मलमले, पोलिस नाईक दुबाळे, हेमंत आहेर, दीपक वाणी, मनोहर कोळी यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवरून खुनाचा शोध लावला. वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे तपास करीत आहेत.  

हेही वाचा  > तीन वर्षांची 'ती' चिमुकली सर्वांचीच लाडकी...पलंगावर खेळत होती...अचानक....

Image may contain: 1 person

संशयित आकाश डोळस 

हेही वाचा  > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The killer is suspect in a burglary attempt at Nashik Crime Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: