किशोर दराडे यांनी नागपूर अधिवेशनात घेतली आमदारपदाची शपथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.

येवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.

नागपूर येथे विधानपरिषदेत शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दराडे यांना आमदारकीची शपथ दिली. सभागृहात स्थनिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे व श्री. दराडे एकाच बाकावर बसलेले होते. शपथ समारंभ झाल्यावर सभागृहात शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे, शिवसेनेच्या सभागृह नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार हेमंत टकले, जोगेंद्र कवाडे आदींनी दराडे यांना शुभेच्छा दिल्या.

दराडेच्या शपथविधीसाठी येथून नागपूरला शंभरावर कार्यकर्ते गेलेले होते. त्यांच्याशी संवाद साधतांना दराडे यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून यापूर्वीही यावर आवाज उठवला गेला आहे. मात्र मी पुढाकार घेऊन शिक्षक आमदारांना एकत्र करीत अधिकाधिक प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठी प्राधान्याने लक्ष केंद्रित करणार आहे. मागील 15 वर्षापासून शिक्षक अनुदानाच्या मागणीसाठी भांडत असून त्यांना वेतन सुरु होणे गरजेचे आहे. यासाठी मंत्रीमहोदयांकडे आग्रह धरणार आहेच. पण वेळ पडली तर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना देखील या प्रश्नांची सोडवणूकीसाठी गळ घालेन असे दराडे म्हणाले.         

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दराडे बंधूनी भेट घेतली असता त्यावेळी त्यांनीही अभिनंदन केले. याचवेळी त्यांच्या कशात आमदार शेलार यांनी, दराडे बंधूची महाराष्ट्रात हवा आहे. अशी कोटी करत अभिनंदन केले. याशिवाय मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे, अनिल राठोड, जितेन्द्र आव्हाड आदींनीही भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सभापती संभाजी पवार, शिक्षक सेनेचे नेते संजय चव्हाण, बाजार समितीचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. सुधीर जाधव, प्रवीण पाटील, कांतीलाल साळवे, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक अजय जैन, रुपेश दराडे, दत्ता वैद्य, दत्तात्रय वाघ, बाळा दाणे, गुड्डू जावळे, देविदास निकम, डॉ. श्रीकांत काकड, दिनेश आव्हाड, पोपट आव्हाड, आल्केश कासलीवाल, लासलगाव बाजार समितीचे संचालक रमेश पालवे, कांदा व्यापारी बाळासाहेब दराडे, प्रमोद बोडके, योगेश गंडाळ, अक्षय राजपूत, सुहास भांबारे, अश्पाक शेख, अण्णा मुंढे, महेश सांगळे आदीसह समर्थक उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kishor Darade took oath as an MLA in Nagpur session