मंत्री महाजन यांच्या पतंगीला महापालिका आयुक्तांचा 'ढील'

मंत्री महाजन यांच्या पतंगीला महापालिका आयुक्तांचा 'ढील'

जळगाव - नियोजित वेळेपेक्षा उशिरा का होईना, जलसंपदामंत्री गिरीश महाजन मैदानात पोचले... रंगबिरंगी पतंगांची सजावट तयारच होती... पतंगीला आकाशी झेप देण्यासाठी मांजा सज्ज होता... दिलखुलास महाजनांनी पतंग ‘सिलेक्‍ट’ केली अन् ती उडण्यासाठी झाली सज्ज... मंत्री महाजन यांच्या पतंगीला ‘ढिल’ द्यायचे काम केले महापालिका आयुक्तांनी अन्‌ साक्षीदार होते जिल्हाधिकारी...! 

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे येथील खानदेश सेंट्रलच्या मैदानावर आज ‘पतंगोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर सीमा भोळे, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे आदी राजकीय मंडळींचीही जत्रा भरली होती. महाजनांनी त्यांच्या आवडत्या गुलाबी पतंगीची निवड केली आणि तिला आकाशात पाठविण्यासाठी सज्ज झाले. आयुक्त डांगे यांनी मांजाचा ‘ढिल’ दिल्यानंतर महाजनांची पतंग आकाशात उडू लागले.

‘राजकीय हवे’ची दिशा...
हवेची दिशा पाहून महाजन पतंग उडवीत होते आणि संगतीला ‘गं बाई मी पतंग उडवीत होते...’ हे गीत सुरू होते. या उत्सवाची लाइव्ह कॉमेंट्री करणाऱ्या विश्‍लेषकानेही मग आगामी काळातील ‘राजकीय हवे’ची दिशा काय असेल, याचा अंदाज बांधत मंत्री महाजनांचा त्याच्याशी संबंध जोडला. ‘राजकीय हवे’ची दिशा ओळखून मंत्री महाजनांनी त्यांची पतंग चांगलीच उंच उडवली, असा हा विश्‍लेषक म्हणाला अन् उत्सवातील नूर आणखीच बदलला...! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com