कोपरगाव राज्य महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

येवला - तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्याच्या पुढे मालेगाव कोपरगाव राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ते अडीच वर्ष वय असलेला नर बिबट्या ठार झाला. रात्रीच्या वेळी राज्य महामार्गावर रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली असून, त्याच्या डोक्याला, तोंडाला मार लागल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचा मृतदेह अंगणगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात येऊन बिबट्याचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे यांचे समक्ष शवविच्छेदन करण्यात येउन त्याचे दहन करण्यात आले.

Web Title: Kopargaon road highway leopard killed in a accident