जिल्ह्यात आतापर्यंत  714 कोटींची कर्जमाफी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

जिल्ह्यात आतापर्यंत 
714 कोटींची कर्जमाफी 

जळगावः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार 322 सभासद शेतकऱ्यांना 714 कोटी 80 लाख रुपयांची कर्जमाफी माहिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, कर्जमाफीची नववी ग्रीनलिस्ट जाहीर झाली असून, त्यात 1 हजार 299 सभासदांना कर्जमाफी मिळाली आहे. 

जुलै 2017 मध्ये कर्जमाफी योजनेंतर्गत ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक महिना अर्ज भरण्यासाठी गोंधळ उडाला. शेतकऱ्यांना आधारकार्ड क्रमांक देण्याची सक्ती करण्यात आली. यामुळे अर्ज भरण्यास विलंब लागला. नंतर अर्जाचे चावडीवाचन, 1 ते 66 मुद्यांच्या आधारे माहिती ऑडिटरद्वारे भरून, ऑडिट करणे, भरलेल्या माहितीचे इंग्रजीचे मराठीत भाषांतर करणे व मराठीचे इंग्रजीत भाषांतर करणे आदी किचकट प्रक्रिया शासनाने राबविल्या. दिवाळीनंतरही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. दिवाळीनंतरच्या महिन्यापासून ग्रीनलिस्ट जाहीर होण्यास सुरवात झाली. आजअखेरपर्यंत (11 जून) नववी ग्रीन लिस्ट जाहीर झाली. अजूनही काही ग्रीन लिस्ट येतील. कर्जमाफी योजनेंतर्गत ग्रीन लिस्ट येण्याची प्रक्रिया अजून वर्षभर तरी सुरूच राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला कर्जमाफी मिळेल, अशीच आशा लागून राहील. 
निकषाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्‍य होते त्यांना कर्जमाफी शासनाने दिलेली असल्याचा दावा केला आहे. 

कर्ज मिळेनासे 
अनेक शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बॅंकेकडून, राष्ट्रीयकृत बॅंकेकडून खरिपासाठी कर्ज मिळालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मागे बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे आदेश दिले होते. अद्यापही असंख्य शेतकऱ्यांना खरिपासाठी उधारी, उसनवारी करावी लागत आहे. 
 
Web Title: kotichy