'कृष्णापुरी' त पाणी सोडा; अन्यथा 'तहसील'मध्ये गुरे

दीपक कच्छवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

आश्वासनाचे काय...?
कृष्णापुरी धरणात पाणी टाकावे आशी  मागणी शेतकरी आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे गेल्या तीन महीन्यापासुन करीत आहेत.मात्र आमदारांनी शेतकर्यांना निराश न करता पाणी देवुच असेच आश्वासन दिले जात आहे.त्यामुळे या अश्वासनावर तीन महिने लोटली गेली.तरी पाणी सोडले जात नाही.शेवटी नाईलाजाने शेतकर्यांसह कृर्षणापुरी ग्रामस्थांना उपोषणाला बसावे लागले.हे उपोषण मागे घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने  ग्रामस्थांना पाणी देवु असे लेखी हमी दिली. परंतु तरीही ग्रामस्थ उपोषण सोडण्यास तयार नव्हते.यावेळी  तहसिलदार कैलास देवरे यांनी ग्रामस्थांना समजावुन सांगितले व पाणी दिलेच जाईल असे आश्वासन दिले. मग ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) : गिरणा धरणातून सुरू  असलेले पाझण डावा कालवाचे पाणी 'कृष्णापुरी धरणात टाकण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांना उपोषणाचे अस्त्र उगारावे लागले.मात्र, प्रशासनाकडुन ग्रामस्थांना अश्वासनाची खैरात करण्यात आली.वारंवार तोंडी व लेखी सुचना देवुनही कारवाई शुन्य झाल्याने शेतकर्यांचा भ्रमनिरास झाला आहे. धरणात पाणी न सोडल्यास परिसरातील 200 हेक्टरवरील पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असुन,तहसील आवारात गुरे सोडण्याचा इशाराही कृष्णापुरी ग्रामस्थांनी दिला आहे.

कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) येथील धरणात 'गिरणा' चे पाणी टाकावे हा विषय गेल्या अनेक दिवसापासून  'सकाळ' ने  लावुन धरला होता.पाणी मिळण्यासाठी शेतकर्यासह ग्रामस्थांना शेवटी  उपोषणाला बसावे लागले.परंतू  पाटबंधारे विभागाने दिलेले  आश्वासन कितपत खरे ठरेल हा  येणारा काळच ठरवेल. पाझण डावा कालव्याचे पाणीही खुप  वाया गेले.या वाया गेलेल्या पाण्याचा हिशोब दिला जात नाही का? शेतकर्यांना पाणी देण्याची वेळ आली तर पाण्याचा हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे नेमके या पाटबंधारे विभागात चाललंय तरी काय  कुणालाच काही कळेना असाच काहीसा प्रकार दिसत आहे. वरखेडे ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या दरातांडा येथे देखील पाणीटंचाई जाणवत असल्याने याठिकाणी  प्रातंधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे  यांनी पहाणी केली.या पाहणीत त्यांनी आजुबाजुला असलेल्या विहीरीच्या पाण्याची पातळी खालावली असल्याने त्या भागात सध्यातरी कुठेच पाणी नसल्याचे चित्र स्वता त्यांनी पाहीले आहे. त्यामुळे प्रशासनाने  या भागातील पाणीटंचाई दुर करण्यासाठी एकमेव कृष्णापुरी धरणात पाणी टाकण्यासाठी प्रयत्न करावा  हाच एक पर्याय सध्यातरी दिसत आहे.

आश्वासनाचे काय...?
कृष्णापुरी धरणात पाणी टाकावे आशी  मागणी शेतकरी आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे गेल्या तीन महीन्यापासुन करीत आहेत.मात्र आमदारांनी शेतकर्यांना निराश न करता पाणी देवुच असेच आश्वासन दिले जात आहे.त्यामुळे या अश्वासनावर तीन महिने लोटली गेली.तरी पाणी सोडले जात नाही.शेवटी नाईलाजाने शेतकर्यांसह कृर्षणापुरी ग्रामस्थांना उपोषणाला बसावे लागले.हे उपोषण मागे घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने  ग्रामस्थांना पाणी देवु असे लेखी हमी दिली. परंतु तरीही ग्रामस्थ उपोषण सोडण्यास तयार नव्हते.यावेळी  तहसिलदार कैलास देवरे यांनी ग्रामस्थांना समजावुन सांगितले व पाणी दिलेच जाईल असे आश्वासन दिले. मग ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

Web Title: Krushnapuri dam water issue in Chalisgaon