"तुला दुसरा मुलगाच झाला पाहिजे"...शेवटी तिने कंटाळून... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

शैलेजा मनीष शाही असे मृत विवाहितेचे नाव आहे. मनीष अंजनीनंदन शाही, अंजनीनंदन भैरवलाल शाही, किरण अंजनीनंदन शाही (सर्व रा. ड्रीमसिटी, आगार टाकळी रोड, उपनगर) असे आरोपींची नावे आहेत. शैलेजा आणि मनीष यांचा 2009 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर दोन वर्षांनी आरोपींनी शैलेजा हिला दुसरा मुलगा होऊ देण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास सुरू केला.

नाशिक : टाकळी रोडवरील ड्रीमसिटी येथे दुसरा मुलगा होण्यासाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने पती, सासू-सासरे या तिघांना सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना 2016 मध्ये घडली होती. 

असा केला होता छळ
शैलेजा मनीष शाही असे मृत विवाहितेचे नाव आहे. मनीष अंजनीनंदन शाही, अंजनीनंदन भैरवलाल शाही, किरण अंजनीनंदन शाही (सर्व रा. ड्रीमसिटी, आगार टाकळी रोड, उपनगर) असे आरोपींची नावे आहेत. शैलेजा आणि मनीष यांचा 2009 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर दोन वर्षांनी आरोपींनी शैलेजा हिला दुसरा मुलगा होऊ देण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास सुरू केला. त्यामुळे 11 सप्टेंबर 2016 मध्ये शैलेजा हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना सात वर्षे सश्रम कारावास 

उपनिरीक्षक एल. बी. कारंडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश श्रीमती एस. एस. नायर यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड.  रेवती महेंद्र कोतवाल यांनी कामकाज पाहिले. यावेळी सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदार यांच्या साक्षीने आरोपीविरोधात आरोप सिद्ध झाले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार के. के. गायकवाड, आर. आर. जाधव, महिला कॉन्स्टेबल एम. टी. दिकोंडा यांनी पाठपुरावा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lady harassment at Nashik Crime News