धामणगावला नाला खोलीकरणाच्या कामास प्रारंभ

दीपक कच्छवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

शेतकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद 
'सकाळ रिलीफ फंडा' च्या माध्यमातून मिळणार्‍या निधीतून नाला खोलीकरणाचे काम होत असले तरी, या कामात धामणगावकरांनी आपलाही  सहभाग असावा म्हणून गावातील प्रत्येक शेतकरी शंभर रुपये लोकसहभागातुन मदत करणार आहे.त्यामुळे नाला खोलीकरणाच्या कामाला बळकटी येणार आहे.

मेहुणबारे : धामणगाव( ता.चाळीसगाव)येथे  जलसंधारणाच्या चळवळीला 'सकाळ रिलीफ'फंडाची मोलाची साथ मिळाली आहे. 'सकाळ'माध्यम समूहाच्या तनिष्का गटाच्या माध्यमातून   धामणगावला नाला खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ झाला.या कामामुळे पाणीटंचाईवर मात करता येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत  धामणगाव येथे आज सकाळी विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांनी बैठक झाली.'सकाळ' च्या खान्देश आवृत्तीचे युनीट मॅनेजर संजय पागे, इन्कमटॅक्स कमिशनर उज्वलकुमार चव्हाण, 'तनिष्का' चे व्यवस्थापक अमोल भट, चाळीसगाव विभागीय कार्यालयाचे उपसंपादक अनन शिंपी उपस्थितीत होते. बैठकीत  श्री पागे यांनी 'सकाळ' रिलीफ फंडा च्या माध्यमातून महाराष्ट्रात ठिकठिकाणी केलेल्या व होत असलेल्या कामाची माहिती दिली.श्री.भट यांनी नाला खोलीकरणाच्या कामासंदर्भात माहीती सांगुन 'सकाळ' तर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची ग्रामस्थांना ओळख करून दिली.यावेळी ग्रामस्थांनी उपस्थितत केलेल्या शंकांचे श्री.पागे यांनी निरसन केले.श्री चव्हाण यांनी पारदर्शकपणे तसेच सर्वाना सोबत घेऊन गावाच्या विकासाची कामे केली जातील असे सांगितले.

सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून  'सकाळ सुमह' राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले.गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने 'तनिष्का' गटाने नाला खोलीकरणाचे काम व्हावे,असा प्रस्ताव सकाळ कार्यलयाकडे पाठविला होता.त्यानुसार 'तनिष्का' व 'सकाळ रिलीफ फंडा' तर्फे येथे आज नाला खोलीकरणाचा प्रारंभ सरपंच अनुसयाबाई मोरे, तनिष्का गटप्रमुख शोभा चव्हाण, उपसरपंच बालाजी पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. तनिष्का सदस्या मालुबाई जगताप,भालचंद्र पाटील,सुनिल पवार, ईदुंबाई पवार,हिरामण मोरे,मथुराबाई पवार, शशिकला पवार, छायाबाई जगताप, तुषार निकम दिलीप जगताप,बबनराव निकम,दिपक निकम,शालिकराव जगताप, शांताबाई पवार, लताबाई पवार,ईदुंबाई निकम, उषाबाई निकम,सुमनबाई पवार, कमलाबाई पवार,मीनाबाई पवार, मंगलबाई पवार,सुपडु निकम, विजय शितोळे, चित्राम मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद 
'सकाळ रिलीफ फंडा' च्या माध्यमातून मिळणार्‍या निधीतून नाला खोलीकरणाचे काम होत असले तरी, या कामात धामणगावकरांनी आपलाही  सहभाग असावा म्हणून गावातील प्रत्येक शेतकरी शंभर रुपये लोकसहभागातुन मदत करणार आहे.त्यामुळे नाला खोलीकरणाच्या कामाला बळकटी येणार आहे.

Web Title: lake work in Dhamangaon