जमिनीची ‘व्यवहारनीती’ चित्ररूपात...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

जळगाव - जमिनीचे व्यवहार, गावदप्तरातील त्यांच्या व्यवहारांच्या नोंदीच्या प्रक्रिया याबाबत सामान्य व्यक्ती आजही अनभिज्ञ असतो. त्यातील किचकटपणा हे या अनभिज्ञतेमागील मुख्य कारण असते. त्याची परिणती जमीन व्यवहारांतील फसवणुकीत होते. जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येते, तेव्हा नशिबी येतात ते कोर्टकचेऱ्या. यावर उपाय म्हणून ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ या संतोक्तीचा अवलंब करून सर्वसामान्यांना जमीन व्यवहाराच्या सर्व बाबींचे ज्ञान देणे, हे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आणि तेही गोष्टीरूपात मिळाले तर? अगदी असेच सकलांना शहाणे करण्याचे व्रत अंगीकारलेय जळगावचे तहसीलदार अमोल निकम यांनी...

येथील तहसील कार्यालयाच्या दगडी भिंती आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला खरेदी- विक्रीच्या व्यवहारांची माहिती मिळावी यासाठी संपूर्ण कार्यालयाच्या आवारात ‘जमीन व्यवहारनीती’च्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. गोष्टीस्वरूपात नागरिकांना जमिनीच्या व्यवहारांच्या सर्व बाबी चित्रमय व कथास्वरूपात साकारण्यात आल्या आहेत. नागरिकांना यातून सहज माहिती मिळते.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या प्रतिमांचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यासोबतच देवत्व लाभलेल्या यशवंत देवमामलेदार भोसेकर (सटाणा) यांची प्रतिमाही लावण्यात आली आहे. प्रशासन आणि जनतेत सुसंवाद साधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या उपक्रमाकडे पाहताना लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम म्हणूनही या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे. सध्या तहसील कार्यालयात या कथा वाचण्यासाठी आणि चित्रे पाहण्यासाठी नागरिक आवर्जून गर्दी करताना दिसत आहेत. या प्रतिमांचा त्यांना निश्‍चित फायदा होत आहे. यातूनच भविष्यातील तंटे कमी होण्यास निश्‍चितच मदत होईल.

२५ आकर्षक प्रतिमा
शेतजमिनीची खरेदी- विक्री, गहाण खत, पंच खरेदी, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, जमिनीची वाटणी, भाऊबंदकीचे वाद, सावकारी व्यवहार, कर्ज प्रकरणे या व अन्य बाबींसंदर्भातील माहिती गोष्टीस्वरूपात देण्यात आली आहे.

Web Title: Land transaction practices as pictured