आली दिवाळी! आकाशकंदील अन् पणत्यांनी सजली बाजारपेठ

योगेश बच्छाव : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव दहा दिवसांवर आला आहे. शहरात वेगवेगळ्या रंगांचे आकाशकंदील, पणत्या, रोषणाईचा माळ्या, दाराचे रंगीबेरंगी तोरन, मुलांची खेळणी, वस्तू, महालक्ष्मीच्या मूर्तीची, छायाचित्र अशा वस्तूंसह किराणा व कापड बाजार फुलला आहे. किमती वाढूनही बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

मालेगाव : प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव दहा दिवसांवर आला आहे. शहरात वेगवेगळ्या रंगांचे आकाशकंदील, पणत्या, रोषणाईचा माळ्या, दाराचे रंगीबेरंगी तोरन, मुलांची खेळणी, वस्तू, महालक्ष्मीच्या मूर्तीची, छायाचित्र अशा वस्तूंसह किराणा व कापड बाजार फुलला आहे. किमती वाढूनही बाजारात गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीच्या खरेदीची धूम अजून सुरू झाली नसली, तरी किराणा व कापड बाजारात चांगली गर्दी दिसत आहे.

चायनामेड व भारतीय वस्तूंनाही तितकीच मागणी

यंदा या सर्व वस्तूंच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढल्या आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरातील संगमेश्वर, मौसम चौक, सोयगाव मार्केट आदी भागातील दुकाने सजली आहेत. यंदा चायनीज वस्तूंचा मागणी आहे. त्यात प्लास्टिक चे चायनीज आकाशकंदिल, कापडी आकाशकंदील यांचा समावेश आहे. त्यामुळे कागदाचे आकाशकंदील, तसेच हाताने बनविण्यात येणारे आकाशकंदील मागे पडले आहेत. १०० ते ७०० रुपयांपर्यंत चायनीज आकाशकंदील व पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंत कागदाचे आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे चायना लाईटच्या माळांनाही मागणी आहे. ६० ते ७०० रुपयांपर्यंतच्या लाईटच्या माळा बाजारात उपलब्ध आहेत. तसेच, दारांना लावावयाच्या  रंगीबेरंगी तोरणांच्या किमतीत वाढ झाली कुटुंबीयांची बाजारात लगबग सुरू आहे.

लहान मुलांना फटाक्यांचा उत्साह

यंदा चांगल्या पावसामुळे दिवाळीत उत्साह आहे. लहान मुलांना तयार कपडे घेण्यासाठी राहील. या हिशेबाने सर्वच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची साठवण करून ठेवले आहे. फटाक्यांच्या स्टॉल साठी जागा आरक्षित
केली जात आहे. आणखी चार पाच दिवसांत विक्री ला सुरुवात होईल.

वस्तूंच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ

मातीच्या तसेच चिनी मातीच्या आकर्षक पण त्यांच्या किमती यंदा दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. पण त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षिला जात आहे. नक्षीकाम केलेल्या मातीच्या पणत्या ६० रुपये डझन, चिनी मातीच्या ७२ रुपये डझन, तर साध्या २४ रुपये डझनने मिळत आहेत.

प्रतिक्रिया

यंदा चायना मेड आकाशकंदील, लाइट माळ, रंगीबेरंगी तोरण यांना चांगली मागणी आहे. वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या, तरी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. चायना मेड वस्तूंना ग्रामीण भागातही पसंती दिली जात आहे.
- अल्पेश जैन, विक्रेता, संगमेश्वर

नक्षीकाम केलेल्या व चिनी मातीच्या पणत्या उपलब्ध आहेत. चिनी मातीच्या तुलनेत नक्षीकाम केलेल्या पण त्यांना जास्त मागणी आहे. मात्र, किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- शत्रुघ्न साहू. पणती विक्रेते, मालेगाव
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lantern and lamp available in market due to diwali