व्हॉट्‌सऍपवर निरोप टाकत युवकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

सिन्नर - "अखेर घेतला ना भो निरोप', असे स्टेट्‌स टाकत पंचाळे (ता. सिन्नर) येथील युवकाने घराच्या पाठीमागील झाडाला दोरीने गळफास घेत शुक्रवारी (ता. 18) मध्यरात्री आत्महत्या केली. संदीप साहेबराव सैंद्रे (वय 19, रा. पंचाळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

पंचाळेपासून एक किलोमीटरवर भोकणी रस्त्यावर सैंद्रे यांचे घर आहे. एस.वाय.बी.ए. शिक्षण झालेला संदीप मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील रिंग गीअर्स कारखान्यात अकरा हजार रुपये मासिक वेतनावर काम करत होता. दुपारी चारला संदीपची ड्यूटी संपली. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने पंचाळे येथील आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी केला. रात्री नऊला जेवण करून तो झोपी गेला. मध्यरात्री दोन वाजून 34 मिनिटांनी त्याने व्हॉट्‌सऍपवर "अखेर घेतला ना भो निरोप', असे स्टेट्‌स टाकले. रात्रीच्या वेळी कोणत्याही मित्राने त्याचे स्टेट्‌स बघितले नाही. सकाळी संदीप घरात नसल्याने त्याचा शोध घेतला असता, घरापासून एक हजार फुटांवर असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाच्या सुमारे 20 फूट उंचीवर दोरी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत संदीपच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली. शनिवारी (ता.19) दुपारी एकच्या सुमारास पंचाळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Last comment on whatsapp & youth suicide