आजचा दिवस अर्ज माघारीचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

या वेळी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी एकच दिवस निश्‍चित केला.

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अर्ज माघारीसाठी उद्या (ता. 13) सकाळी 11 ते दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या माघारीसाठी एकच दिवस दिलेला असल्यामुळे मोठी झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. निवडणूक चिन्ह वाटपानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 6 फेब्रुवारी होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी झाली. या वेळी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी एकच दिवस निश्‍चित केला.

त्यानुसार उद्या (ता. 13) सकाळी अकरापासून उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज छाननी झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज माघारीचा निर्णय घेण्यासाठी या वेळी पाच दिवसांची उसंत देण्यात आली. यामुळे बंडखोरांना चुचकारण्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला.

Web Title: last day of withdrawal of candidature