लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा 

अमोल कासार
शुक्रवार, 8 मार्च 2019

लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा 

जळगाव  : एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुषाचा हातही महत्त्वाचा असतो. भरतकाम करणाऱ्या हातांनी मशिनरी वाईंडींगचे धडे घेत पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून एक ठसा निर्माण केला त्या लक्ष्मी नारखेडे यांनी. पुरेसे आर्थिक पाठबळ, शिक्षणाची शिदोरी नसताना देखील केवळ प्रोत्साहन, परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशस्वी महिला उद्योजक म्हणून लौकिक मिळविला. 

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मी नारखेडे यांनी उद्योजक जगतात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिंगच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविण्याचा निश्‍चय मनाशी करून घेतला होता. गुंडाळलेल्या वायर्सचे वेटोळे बघून त्यांना काम करण्याची उत्सुकता निर्माण होत होती. त्यामुळे भरतकाम करणाऱ्या सौ. नारखेडे या तांब्याच्या तारेचे विणकाम नक्कीच करू शकेल असा विश्‍वास त्यांचे पती नरेंद्र नारखेडे यांना होता. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता पत्नीला मोटार्स वाईंडींगचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. 

पतींना मानले गुरू 
लक्ष्मी नारखेडे यांनी पती नरेंद्र नारखेडे यांना औद्योगिक क्षेत्रातील आपला गुरू मानून मोटर्स वाईंडिंगचे तांत्रिककाम शिकण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून शिकलेल्या कामावर सौ. नारखेडे स्वतःची कंपनी सुरू करून त्या आजतागायत तब्बल 67 वर्ष वर्कशॉपमध्ये करीत आहे. सौ. नारखेडे यांनी सन 1973 मध्ये सुरू केलेली दीपक इंडस्ट्रीज नावाने मोटार वाईंडिग करणारी मोठी कंपनी नावारुपाला आलेली असल्याने सौ. नारखेडे यांनी पुरुषप्रधान व्यवसायात त्यांनी आपले अस्तित्व सिद्‌ध केले. 

विदेशातून घेतले प्रशिक्षण 
पूर्वीच्या काळी महिलांनी नोकरी करण्यासह औद्योगीक क्षेत्रात येणे अत्यंत अवघड होते. परंतु पतीच्या पाठबळामुळे त्यांनी आपल्या क्षेत्रात क्रांती करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह सिंगापूर देशांमध्ये वाईंडींगबाबत अत्याधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण घेऊन ते आपला व्यवसाय करीत असून तोच व्यवसाय त्यांचे मुले व सुना आता अविरतपणे सुरू आहे. 

अनेक पुरस्कारांनी गौरव 
सन 1994-95 मध्ये चारुभाई इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट रिसर्च ट्रस्ट सांगली यांचा उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, उद्यमी महिला पुरस्कार, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हा उद्योग प्रथम पुरस्कार, लघु उद्योजक भारतीचा जीवन गौरव पुरस्कार यासह विविध पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxmi narkhede waindig shetrat tasa