Dhule Crime News : वाहने लुटणारी टोळी गजाआड; धुळे एलसीबीची कारवाई

Crime News
Crime Newsesakal

धुळे : रस्त्यावरील वाहनांना अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला येथील एलसीबीच्या (LCB) पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. (LCB team arrest gang who has blocked vehicles and forced theft dhule crime news)

टोळीतील दोघे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्रात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

येथील देवपुरातील निवृत्त शिक्षक मगन बाळू पाटील (रा. प्लॉट क्रमांक १२०, सुदर्शन कॉलनी) १७ मार्चला चंदनपुरी (ता. मालेगाव) येथून दुचाकीने धुळे येथे येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा (ता. धुळे) शिवारातील एका हॉटेलजवळ दोन व्यक्तींनी दुचाकीवर येत श्री. पाटील यांना अडविले.

हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख पाच हजार रुपये, घड्याळ, आधारकार्ड, मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जबरीने लुटून नेला. याबाबत मगन पाटील यांनी धुळे तालुका पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Crime News
Fake Currency Notes : सावधान! तुमच्याकडे नकली नोटा आल्यात का? 500 च्या नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

गुन्ह्याचा एलसीबीकडून समांतर तपास सुरू होता. यादरम्यान हा गुन्हा मालेगाव येथील सराईत गुन्हेगार भगवान सीताराम करगळ (रा. सावडगाव, ता. मालेगाव) व विठोबा रामचंद्र बाचकर (रा. टिपे, ता. मालेगाव) यांनी केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोघा संशयितांना मालेगाव येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ७० हजारांच्या दोन दुचाकी व दोन हजारांचा मोबाईल असा ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपासासाठी दोघांना धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले.

संशयित भगवान सीताराम करगळ व विठोबा रामचंद्र बाचकर हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. दोघांवर विविध पोलिस ठाण्यांत चोरी, घरफोडी, लुटीचे गुन्हे दाखल आहेत. त्यात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच, जायखेडा, चाळीसगाव शहर, वडनेर-खाकुर्डी, किल्ला व देवळा पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, श्रीशैल जाधव, अमोल जाधव, विनोद पाठक, योगेश ठाकूर, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Crime News
Viral Infection Case Rise : नंदुरबार फणफणले; सर्दी, खोकला, ताप व अंगदुखीने नागरिक हैराण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com