उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारासाठी नेत्यांची धावपळ

रोशन भामरे
शनिवार, 26 मे 2018

तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, पहिल्या दिवशीच उन्हातान्हात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. एरव्ही एसीमध्ये थंड हवा घेत डावपेच आखणारा नेता आता उन्हाच्या चटक्यांची पर्वा न करता गावोगावी मतदारांच्या भेटी घेत स्वतःला झोकून देत आहे. या पंधरवड्याचे महत्व मतदारांनाही कळलेले आहे. निवडणुका आल्या की नेत्यांना प्रचाराशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. उन्हातान्हाची पर्वा न करता मतयाचना करण्यासाठी त्यांची धावपळ सुरु असते.

निशाण्या मिळताच उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका चालविला आहे. कधी ओळख नसलेल्या मतदार राजाकडे सुद्धा नेते सध्या मतदारांची मनधरणी करत आहेत. नेते कडक उन्हात पायपीट करत आहेत. व नको त्याच्या पायावर वाकव लागत आहे.

कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदार दिवसा होणाऱ्या छोट्या मोठ्या सभा पासून दूर असला तरी नेत्यांना मात्र उन्हाचे चटके सहन करत मतदारांची मनधरणी करावी लागत आहे. रणरणते उन अवेळी होणाऱ्या गावोगावी बैठका, आचारसंहितेची बंधने, मतदाराना आकर्षित न करणारे प्रचारातील मुद्दे अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन प्रचार करावा लागत आहे.

सर्वच शेतकरी मतदार हे खेड्या-पाड्यातील असून, तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक हे आपापल्या शेतात राहतात. त्यामुळे उमेदवारांना बांद, पांद्या, पायवाटा तुडवून मतदारांच्या भेटी घ्यावा लागत आहेत.

प्रत्येक उमेदवार आपापल्या गणातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी गावागावात जाऊन बैठका घेत असून, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केले जात आहे. यात मात्र सुशिक्षित मतदार उन्हापासून लाबच राहतात. उन्हात प्रचार करताना कार्यकर्त्यांना मात्र टोपी व रुमालांचा सहारा घ्यावा लागत आहे. अजून दहा ते बारा दिवस चालणाऱ्या या प्रचाराला उमेदवार व कार्यकर्त्यांना रणरणत्या उन्हात घाम गाळावा लागणार आहे.
 
Web Title: leaders to campaign for utpanna bazar samitee