Nandurbar News : सोशल मीडियावर शोलेच्या गब्बर अन् ठाकूरची चर्चा

Social Media
Social MediaSakal

Nandurbar News : सध्या जिल्हाभरात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील राजकीय परिस्थितीवर सोशल मीडियावर शोले चित्रपटातील गब्बरसिंग आणि ठाकूर यांची एकच चर्चा सुरू आहे. (Leaders who were rivals reconciled at one place and some staunch supporters were also exchanged nandurbar news)

राजकारणात कायमचा कोणीच कोणाचा मित्र आणि कोणीच कोणाचा शत्रू नसतो हे जरी ब्रीद खरे असले, तरी अगदीच एकमेकांच्या समोरासमोर दंड थोपटणारे नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा सामान्य कार्यकर्त्यांची गडचेपी होते.

दोन नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात बघतात मात्र त्यांचे तेच नेते एका ठिकाणी एकाच व्यासपीठावर जवळ आल्यास कार्यकर्त्यांची संम्रावस्था होते. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन प्रमुख पॅनल एकमेकांसमोर मोठ्या ताकदीने लढले. यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी नेते दिलजमाई करून एकाच ठिकाणी तसेच काही कट्टर समर्थक नेत्यांची अदलाबदलीदेखील झाली. यामुळे तालुक्यात अनेक राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Social Media
Summer Season : मालेगावचा पारा 41.2 अंशावर; दिवसभर चटके देणारे ऊन, हंगामी व्यावसायिकांचा जीव भांड्यात

अनेक राजकीय तर्कवितर्क आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वर्तविले जात आहेत. असाच काहीसा प्रकार शहादा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अगदीच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे एकमेकांना शह देण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा पुरेपूर वापर करणारे अनेक नेते एकत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त सर्व मतभेद विसरून एकदिलाने एकमताने एकत्र आल्याने सध्या हा विषय शहादा तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला.

याच विषयाला अनुसरून सोशल मीडियावर शोले चित्रपटाचे गब्बर सिंग आणि ठाकूर यांची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ‘चुनाव के चक्कर में आपसी रिश्ते खराब ना करे, बाद में गब्बर और ठाकूर सब एक साथ दिखते हैं' अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

Social Media
Nandurbar News : गोमाई नदीपात्रात म्हसावदच्या तरुणाचा मृतदेह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com