उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी येथे केले.

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी येथे केले.

येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण, रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाण व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सटाणा महाविद्यालयात आयोजित 'उद्योजकता विकास' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून श्री. आहेर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल दादा देशमुख, उपप्रांतपाल राकेश डीडवाणीया, रोटरी क्लब नाशिक ईस्टच्या अध्यक्षा नेहा खरे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, रोटरी अध्यक्ष प्रदीप बच्छाव, सचिव अभिजित सोनवणे आदी उपस्थित होते. उद्योगातून मिळणारा नफा, भविष्यकाळात असलेला वाव, उद्योगातून मिळणा-या पैशाचा वेग आणि उद्योगाचे नाविन्य अथवा वेगळेपण यातूनच उद्योजक यशस्वी होऊ शकतो, असेही आहेर यांनी यावेळी स्पष्ट केले.  

रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप बच्छाव यांनी प्रास्ताविकात विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास माजी उपप्रांतपाल डॉ. प्रकाश जगताप, रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा अक्षदा सुर्यवंशी, डॉ. मनोज शिंदे, प्रा. बी. के. पाटील, प्रा. शांताराम गुंजाळ, प्रा. राजेंद्र वसईत, डॉ. अंजली जगताप, प्रल्हाद सोनवणे, डॉ. कुलदीप जाधव, रामदास पाटील, बी. डी. बोरसे, मनोज जाधव, उमेश बिरारी, योगेश अहिरे, शुभम पाटील, कमलेश जाधव, निर्मल बिनायक्या, उमेश खैरनार, अख्तर शाहा, आदित्य गायकवाड, सागर बधान, दामिनी बिरारी, प्रांजल देवरे, वृषाली सोनजे, किरण सौंदाणे, वैष्णवी सोनवणे, साक्षी खैरनार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. रोटरॅक्ट क्लबचे सचिव योगेश जाधव यांनी आभार मानले.

रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशपातळीवर आपला ठसा उमटविणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर तसेच शिक्षण व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांना माजी प्रांतपाल दादा देशमुख यांच्या हस्ते 'रोटरी वोकॅशनल' पुरस्कार देवून गौरविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lecture of hiraman aaher in satana