
शांताराम जाधव, हरिभाऊ जाधव, सूर्यभान बेरड, कैलास भांगरे, भास्कर जाधव, बाळासाहेब जाधव आदी कबड्डीपटूंनी गावाची ओळख करून दिली. इथला महिलांचा संघ राष्ट्रीयस्तरापर्यंत पोचला. सुनीता गवाने, सुरेखा जाधव, नलिनी भांगरे या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील गावातील वाड्यात आठ दिवस भूमिगत होते. तसेच प्रांतिक अधिवेशनासाठी 1955 मध्ये पंजाबराव देशमुख यांचे हेलिकॉप्टरने गावात आगमन झाले होते. इथे शंभर वर्षांची वेस असून, ती सुस्थितीत आहे.
नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील साडेसहा हजार लोकसंख्येचे गाव शिंदे. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील गावातील वाड्यात आठ दिवस भूमिगत होते. तसेच प्रांतिक अधिवेशनासाठी 1955 मध्ये पंजाबराव देशमुख यांचे हेलिकॉप्टरने गावात आगमन झाले होते. इथे शंभर वर्षांची वेस असून, ती सुस्थितीत आहे. गावात बांधकाम करताना जमिनीत धान्य साठवण्याचे पेव सापडल्याचे ग्रामस्थ सांगतात. कबड्डी खेळाचा वारसा गावाने जोपासला आहे.
......आदी कबड्डीपटूंनी गावाची ओळख करून दिली.
शांताराम जाधव, हरिभाऊ जाधव, सूर्यभान बेरड, कैलास भांगरे, भास्कर जाधव, बाळासाहेब जाधव आदी कबड्डीपटूंनी गावाची ओळख करून दिली. इथला महिलांचा संघ राष्ट्रीयस्तरापर्यंत पोचला. सुनीता गवाने, सुरेखा जाधव, नलिनी भांगरे या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जनावरांचा दवाखाना आहे. इथला बंगालीबाबा यात्रोत्सव हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. यावेळी दोन रथांची मिरवणूक काढली जाते. गावात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणारे गाव म्हणून शिंदे ओळखले जाते. धोंडिराम जाधव, रामचंद्र भांगरे, विठोबा जाधव, सहादू जाधव आदी नऊ स्वातंत्र्यसैनिक इथलेच. पांडुरंग सांगळे यांनी डाव्या विचारसरणी मानणाऱ्यांचे गाव, अशी गावाची ओळख असल्याची माहिती दिली. इथले ज्येष्ठ कलावंत खंडू झाडे यांनी कुळांवर पोवाडा केला आहे. इथे 1965 मधील शाळा आहे. गावाजवळ 30 कंपन्या आहेत.
शिंदे गावातील 1965 मधील शाळेची इमारत.
सलील अंकोला खेळलाय गावात
गावात मारुती, कानिफनाथ, महादेव, रेणुकामाता, खंडेराव टेकडीवरील खंडेराव महाराज आदी मंदिरे आहेत. मारुती आणि खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव गावात होतो. गावाजवळून गोडंबा नदी वाहते. गावात पूर्वी अहिल्यादेवी होळकरांची बारव होती. ती महामार्ग रुंदीकरण करताना नामशेष झाली. गावात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था आहे. गावाला बचतग्राम व स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाले आहेत. चेहेडी बंधारा योजना खराब झाल्याने गावाला पाण्याची मोठी अडचण भासते. गावाजवळील शिवकालीन हौद पाहण्यासाठी राज्यभरातून अभ्यासक भेटी देतात. इथल्या भजनी मंडळात सुरेश जाधव, सुनील शहाणे, राजाराम जाधव, संदीप तुंगार, चंद्रकांत पगारे, नामदेव मते, दामू सागर आदींचा सहभाग असतो. गावातील रामचंद्र जाधव हे पहिलवान पंचक्रोशित ओळखले जात होते. गावातील क्रिकेट स्पर्धा प्रसिद्ध असून, या स्पर्धांमध्ये सलील अंकोला, तरुण गुप्ता, नंदू छायापती आदी रणजीपटू खेळले आहेत.
शिंदे (ता. नाशिक) : गावची शंभर वर्षांची वेस
अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरावर पोचलेत
गावातील अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरावर पोचलेत. खेळाडूंचे गाव म्हणून ओळख आहे. कबड्डी आणि क्रिकेट खेळाचा त्यात समावेश आहे. गावाजवळ क्रीडांगण व्हावे आणि गावातील चिरांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. - रतन जाधव (माजी सरपंच)
शिवकालीन हौद, धान्य साठवणारे पेव, वेस अशी अनेक वैशिष्ट्ये गावाची आहेत. गावातील बारव बुजल्याची खंत मात्र आम्हाला आहे. - भाऊसाहेब जाधव (ग्रामस्थ)
हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्..
हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...