Leopard Attack : जेबापूर शिवारात 11 शेळ्या फस्त; बिबट्याच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard News

Leopard Attack : जेबापूर शिवारात 11 शेळ्या फस्त; बिबट्याच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

सामोडे (जि. धुळे) : येथून जवळच असलेल्या जेबापूर शिवारातील शेतात असलेल्या झोपडीमधील बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करीत तब्बल अकरा शेळ्या (Goats) फस्त केल्या.

यामध्ये आठ शेळ्या व तीन बोकडांचा समावेश आहे. (leopard attacked tied goats and killed 11 goats dhule news)

पिंपळनेर येथील नंदकुमार ढोले यांचे जेबापूर शिवारात शेत असून, शेतातील झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर वन्यप्राणाने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून त्यांना ठार केले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आल्यानंतर त्यांनी पिंपळनेर वन विभागाला घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पिंपळनेर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. शेतात दोन झोपड्या आहेत. यापैकी एका झोपडीमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. पशुपालकाचे मोठे नुकसान झाले असून, भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

जैबापूरसह सामोडे, चिकसे व म्हसदी (प्र. पिंपळनेर) आदी गावांतील शिवारामध्ये बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत असते. या संदर्भात वन विभागाला वेळोवेळी कळविले असून, त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लहान-मोठे प्राण्यांचे बळी गेले आहेत.

संबंधित विभागाने या वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या हानीचे संरक्षण करावे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :DhuledeathLeopardanimal