विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

म्हसदी (जि. धुळे) - धमनार (ता. साक्री) येथील चुनदरा शिवारात आज पहाटे बिबट्या सावजाचा पाठलाग करताना विहिरीत पडला. वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करीत गुरुवारी दुपारी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याला सायंकाळी लळिंग वनक्षेत्रात सोडण्यात आले.

धमनारच्या चुनदरा-खडगाव वनक्षेत्राला लागून रामदास पुंडलिक सरग यांचे शेत आहे. आज पहाटे सरग शेतात विहिरी जवळ गेले असता त्यांना डरकाळी ऐकू आली. काही शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली.

पिंपळनेर वनविभागाच्या वनक्षेत्रपाल मीनाक्षी जोगदंडे, म्हसदीचे वनपाल एस. डी. देवरे आदींनी ग्रामस्थांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बिबट्या पाइपला लटकल्याने बाहेर येण्यासाठी अडचण येत होती. आधी बिबट्या सुरक्षित राहावा म्हणून खाट सोडण्यात आली. बिबट्या खाटेवर येताच क्रेनद्वारे विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. शर्थीचे प्रयत्न केल्यावर बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश आले.

Web Title: Leopard in cage