नाशिकमध्ये महिनाभरात दुसरा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

animal
animal

नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकरनगर परीसरात सकाळी साडे आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभाग, पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसह संस्थांचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले होते. दाट वस्तीतील परीसरात बिबट्या बंगल्याच्या पाठीमागील भागात ठाण मांडलेल्या बिबट्याला तब्बल आठ तासांनी पकड्यात यश आले असून बिबट्याच्या हल्यात वनपरीमंडळ अधिकारी रविंद्र सोनार जखमी झाले आहेत. याच भागात गेल्या 25 जानेवारीला बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. महिन्याभराच्या आत सावरकरनगरमधून दुसरा बिबट्या पकडण्यात आल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण होते. 

गेल्या 25 जानेवारीला सावरकरनगरमधून बिबट्या पकडल्यानंतर पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीसरात बिबट्या दिसल्याचे नागरीकांनी सांगितले होते. यानंतर वनविभागाने यासंदर्भात खातरजमादेखील केली होती. रविवारी (ता.17) सकाळी साडे आठच्या सुमारास परीसरातील नागरीकांकडून इमारतीबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या रस्त्यावरुन गेल्याचे निदर्शनात आले. यासंदर्भातील माहिती वनविभागाला कळवताच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तुकडीसोबत पोलिसदलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. परीसरातील बंगल्यात बिबट्या ठाण मांडून बसल्याने व सभोवताली पत्र्याचे शेड असल्याने बिबट्या पकडण्यात अडचणी येत होत्या. 

डार्ट मारून बेशुद्ध करण्याच्या प्रयत्नात वनपरीमंडळ अधिकारी रविंद्र मधुकर सोनार यांच्यावर बिबट्याने झडप घेतल्याने ते जखमी झाले. अथ्थक परीश्रमातून बिबट्याला पकडण्याची योजना आखत सुनिल वाडेकर यांनी डार्ट मारत बिबट्याला बेशुद्ध केले. यानंतर पिंजऱ्यातून बिबट्याला वनविभागातील कर्मचाऱ्यांनी नेले. 

नागरिकांच्या गर्दीमुळे बिबट्या पकडण्यात परीश्रम 
बिबट्या असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जागा मिळेल तिथून बिबट्या पाहण्यासाठी नागरीक सरसावले होते. बिबट्या असलेल्या जागेच्या चोहीबाजूंनी नागरीकांचा जमाव झाला होता. त्यातच जमावातील काहींकडून आरडाओरड, दगड फेकण्याचे प्रयत्न होत असल्याने बिबट्या पकडण्यात अतिरिक्‍त परीश्रम घ्यावे लागलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com