चाळीसगाव : पिंपरखेड येथे बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पिंपरखेड शिवारात बिबट्यास जेरबंद करण्यात आले.

चाळीसगाव : पिंपरखेड शिवारात बिबट्यास जेरबंद करण्यात आले आहे.

पिंपरखेड (ता. चाळीसगाव) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने वन्य प्राण्यांवर हल्ला करण्याचे सत्र सुरू ठेवले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली होती.

यासंदर्भात वन विभागाला कळवूनही बिबट्याचा बंदोबस्त केला जात नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी चाळीसगाव वन विभागाच्या कार्यालयावर दोन दिवसांपूर्वी धडक मोर्चा काढला होता. अखेर ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन, वन विभागाने पिंपरखेड शिवारात ज्या ठिकाणी बिबट्याने घरांवर हल्ला केला होता, त्या ठिकाणी काल पिंजरा ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद  करण्यात आले . त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वन विभागातर्फे या बिबट्याला त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard Caught in pimparkhed