यंत्रणेची बिबट्याशी आठ तासांची झुंज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नाशिक - येथील गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठला बिबट्याचे दर्शन घडताच, स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वनविभाग-पोलिस कर्मचारी अन्‌ स्वयंसेवकांच्या आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेची दमछाक झाली होती. बिबट्याच्या हल्ल्यात वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार जखमी झाले. 

नाशिक - येथील गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठला बिबट्याचे दर्शन घडताच, स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वनविभाग-पोलिस कर्मचारी अन्‌ स्वयंसेवकांच्या आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेची दमछाक झाली होती. बिबट्याच्या हल्ल्यात वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार जखमी झाले. 

याच भागात २५ जानेवारीला बिबट्याला पकडण्यात आले होते. आर्किटेक्‍ट कॉलनीतील इमारतीबाहेर असलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या. परिसरात बिबट्या असल्याचे लक्षात येताच, वनविभागाला माहिती कळविण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना बिबट्याचे पंजे दिसले; पण इथून बिबट्या निघून गेल्याचा निष्कर्ष काढत कर्मचारी अकराच्या सुमारास परतले.

वाडेकरांचे बिबटे पकडण्याचे दीड शतक 
बिबट्याचे नागरीवस्तीत आगमन हा जणू नित्याचा भाग बनलाय. त्यातच पुन्हा बिबट्याला पाहण्यासाठी उसळणाऱ्या गर्दीतून त्याला आवरणे म्हणजे दिव्यच. नाशिकमधील वन परिक्षेत्रपाल सुनील वाडेकर यांनी आज दीडशेव्या बिबट्याला पकडण्याचे दिव्य पार केले. वाडेकर हे २००४ पासून बिबट्याला पकडण्याचे काम करतात.

दोन बछड्यांचा वावर
केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) - येथील शेळकेवस्तीत बिबट्यांच्या दोन पिलांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून आठ दिवस झाले आहेत. परंतु त्यात बिबट्या अडकला नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. देशमुख मळा येथे बिबट्याने काही शेळ्यांना ठार मारले होते.

पारगावात दोन वासरांचा फडशा
पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील ढोबळेमळ्यात निवृत्ती ढोबळे यांच्या गोठ्याच्या बाहेर बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. शशिकांत ढोबळे यांनी दीड वर्ष वयाची दोन वासरे गोठ्यासमोरील शेतात बांधली होती. या दोन्ही वासरांवर बिबट्याने हल्ला केला. 

कालवडीला सोडून बिबट्या पसार
निरगुडसर - अवघ्या दहा फुटांवर बिबट्याने कालवडीला पकडलेले... मनात जिवाची भीती आणि कालवडीला वाचविण्याची अगतिकता... यामुळे क्षणाचाही विलंब न करता गणपत काशिबा पारधी यांनी काठी वाजवून आरडाओरडा केल्याने बिबट्याने कालवडीला सोडून पळ काढला. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) हद्दीत रविवारी पहाटे घडली.

Web Title: Leopard in Nashik