रात्री अपरात्री शेतकऱ्यांना या भीतीमुळे टोमॅटो वाहतूक करण्यासही जीव मुठीत धरून शेतात जावे लागते.अनेकांना गाईचे दूध काढण्यासाठी जाणे ही बिबट्याच्या भीतीने अवघड बनले आहे. दोन दिवसांपूर्वी धोंडेगाव येथील शेतकरी उद्धव बत्तासे याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या धोंडेगावच्या एसटी स्टॅण्ड जवळच्या टोमॅटोच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले.
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून गिरणारे-साडगाव रस्त्याच्या ब्राम्हण नदीच्या खोऱ्यात बिबट्या व त्याच्या पिलांचे अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. तसेच धोंडेगावच्या टोमॅटोच्या क्षेत्रात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने धोंडेगाव साडगाव भागात नागरिक, विद्यार्थी, शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
photo : धोंडेगाव भागात टोमॅटो शेतात बिबट्याचे ठसे,
हेही वाचा > फक्त सर्दी-पडशापुरती उरली महापालिका रुग्णालये!
बिबट्याच्या संचाराने साडगाव,धोंडेगाव शिवारात घबराट.
रात्री अपरात्री शेतकऱ्यांना या भीतीमुळे टोमॅटो वाहतूक करण्यासही जीव मुठीत धरून शेतात जावे लागते.अनेकांना गाईचे दूध काढण्यासाठी जाणे ही बिबट्याच्या भीतीने अवघड बनले आहे. दोन दिवसांपूर्वी धोंडेगाव येथील शेतकरी उद्धव बत्तासे याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या धोंडेगावच्या एसटी स्टॅण्ड जवळच्या टोमॅटोच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले.
हेही वाचा > पत्नीच्या निधनानंतर बाप पोटच्या मुलीसोबतच..
वनविभागाकडून दुर्लक्ष
दरम्यान बिबट्याच्या वावर असतांना वनविभाग पिंजरा लावत नसल्याने साडगाव शिवारातील ब्राम्हण नदी परिसरातील ,भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.एकूणच बिबट्याने मागील 6 महिन्यांपूर्वी पिंगळे यांच्या शेतातील तरुणावर जीवघेणा हल्ला करून शेतकऱ्यांना जखमी केले होते,मात्र पिंजरा लावून बिबट्या सापडून देखील पुन्हा दहा दिवसाने तिथेच बिबट्या दिसून आला आहे. यामुळेच वनविभाग बिबट्या नेमका कुठे सोडतो.. याबाबत अनेक नागरिकांना शंका वाटते,मात्र ऐन शेतीच्या कामाच्या हंगामात बिबट्या दिसून येणे म्हणजे शेतकर्यांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे.ही घबराट दूर करण्यासाठी वन विभागाने अधिक कसोटीने बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी उद्धव बत्तासे व साडगाव भागातील शरद थेटे यांनी केली आहे.
photo : उद्धव बत्तासे या शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याचे ठसे