सावधान..तो आसपासच आहे...मानूरचे ग्रामस्थ दहशतीखाली...

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 8 डिसेंबर 2019

रविवारी (ता.8) विनीत अनवट हा सायकलीवरुन त्यांच्या शेतातील विहीरीची मोटर सुरू करायला जात असतांना, काही अंतरावर त्याने विहीरीत पाणी पितांना त्याला पाणी पितांना पाहिले. तिथेच सायकल सोडत धावत घरी जाऊन त्याने याबाबतची माहिती दिली. अनवट कुटुंबिय व गावातील अन्य नागरीक घटनास्थळी पोहचले, परंतु त्यांना बिबट्याच्या पायाच्या ठश्‍या व्यतिरिक्‍त काहीच आढळले नाही.

नाशिक : कधी नव्हे ते प्रथमच औरंगाबाद रोडवरील मानूर गावात बिबट्याचे दर्शन घडल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.8) सकाळी दहाच्या सुमारास विनीत अनवट या शाळकरी मुलाला विहीरीजवळ बिबट्या दिसल्यानंतर गावकरी सतर्क झाले. तातडीने वनविभागाला संपर्क केल्यानंतर दुपारी उशीरा शेतीत सापळा लावण्यात आला. 

......याची ग्रामस्थांना साधी कल्पनाही नव्हती.

गावात ठिकठिकाणी आढळले पायाचे ठसे, वनविभागाने लावला सापळा 
मानूर गावात ऊस आणि द्राक्ष शेतीचे दाट क्षेत्र असल्याने येथे बिबट्या दाखल झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. काही ठिकाणी पायाचे ठसेदेखील आढळले होते. परंतु कुणीही बिबट्याला पाहिलेले नव्हते. रविवारी (ता.8) विनीत अनवट हा सायकलीवरुन त्यांच्या शेतातील विहीरीची मोटर सुरू करायला जात असतांना, काही अंतरावर त्याने विहीरीत पाणी पितांना बिबट्याला पाणी पितांना पाहिले. तिथेच सायकल सोडत धावत घरी जाऊन त्याने याबाबतची माहिती दिली. अनवट कुटुंबिय व गावातील अन्य नागरीक घटनास्थळी पोहचले परंतु त्यांना बिबट्याच्या पायाच्या ठश्‍या व्यतिरिक्‍त काहीच आढळले नाही.

Image may contain: plant, outdoor and nature

दरम्यान या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला कळविण्यात आली. पायाच्या ठश्‍यांवरुन बिबट्याचा परीसरात वावर असल्याचे निश्‍चित केल्यानंतर सापळा रचण्याची प्रक्रिया करण्यात आली. यावेळी वनरक्षक उत्तम पाटील, वनपाल अनिल अहिरराव, वनपाल ओंकार देशपांडे आणि वनरक्षक राजेंद्र ठाकरे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. बिबट्याने दर्शन दिल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. 

गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा 
बिबट्याचा वावर असल्याने सायंकाळी अंधारात गावकऱ्यांनी घराबाहेर पडू नये. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घरातील दिवे सुरू ठेवावेत. बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, अशा विविध सूचना यावेळी गावकऱ्यांना देण्यात आल्या. 

PHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ "लखोबा लोखंडे"...अखेर झाला जेरबंद...

No photo description available.

विहीरीवर पाणी पिणारा बिबट्याच...

विहीरीवर मोटर सुरू करण्यासाठी जात असतांना बिबट्या दिसला. तातडीने घरी धाव घेत कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. परंतु आम्ही पुन्हा पोहचेपर्यंत बिबट्याने पळ काढला होता. - विनीत अनवट, प्रत्यक्षदर्शी. 

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

 > ती म्हणाली " माहेरची परिस्थिती गरीब आहे..पैसे कोठून आणू"..तरीही पतीने....

 > तीन वर्षांची 'ती' चिमुकली सर्वांचीच लाडकी...पलंगावर खेळत होती...अचानक....

 > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard terror in a manur village Nashik Marathi News