
येवला-कोपरगाव रोडवर दोन वर्षांपूर्वी मध्यरात्री वाहनाच्या धडकेने तो मृत स्थितीत आढळला होता. या भागात तो असल्याच्या वृत्ताला तेव्हा दुजोरा मिळाला होता.आता याच परिसरातील पारेगावचे ग्रामस्थ विकास प्रल्हाद काळे व मनोज प्रल्हाद काळे यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा तो दिसला आहे.
नाशिक : नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर येणाऱ्या पारेगाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार वन विभागाने येथे पिंजरा लावला आहे, तर येथून जवळच असलेल्या बदापूर शिवारात शेतकऱ्याच्या चार शेळ्या फस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.
शेळ्या फस्त करतो तो... पारेगावात दिसलाच शेवटी
तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी असल्याने बिबट्या पकडल्याच्या घटना घडल्या नसल्या, तरी त्याने नुकसान केल्याचे प्रकार यापूर्वी मुखेड भागात झाले आहेत. येवला-कोपरगाव रोडवर दोन वर्षांपूर्वी मध्यरात्री वाहनाच्या धडकेने बिबट्या मृत स्थितीत आढळला होता. या भागात बिबट्या असल्याच्या वृत्ताला तेव्हा दुजोरा मिळाला होता.आता याच परिसरातील पारेगावचे ग्रामस्थ विकास प्रल्हाद काळे व मनोज प्रल्हाद काळे यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बिबट्या व त्याचा एक बछडा दिसला आहे. दोनदा असेच प्रकार झाले आहेत. याबाबात माहिती देताच वन विभागाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. परिसरात वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक पी. एस. पाटील, वनरक्षक जी. आर. हरगावकर, सुनील भुरूक यांनी पाहणी केली असता, बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. मात्र, ग्रामस्थांच्या आग्रहाखातर व नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी, यासाठी पारेगाव येथे वन विभागाने पिंजरा लावला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वन विभागाने केले आहे.
हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...
photo : बदापूर शिवारात मृत झालेल्या शेळ्यांची पाहणी करताना वन अधिकारी व शेतकरी.
> PHOTOS : कोंबडा माशाची मिजासच भारी!...'इतक्या' दराचा यंदा तुर्रा
वन विभागाने लावला पिंजरा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, पिंजरा लावल्याच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर दूरवर बदापूर शिवारात गोरख मोरे यांच्या शेतातील शेळी, दोन छोट्या शेळ्या अन् बोकड लांडग्याच्या हल्ल्यात मृत झाल्याचे वन विभागाने सांगितले असून, शेळीही जखमी झाली आहे. वन विभागाने लांडग्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत झाल्याचे सांगितले, तरी शेळ्या बिबट्याने फस्त केल्या का, अशीही शंका उपस्थित होत आहे. लगतच दोन घटना घडल्याने परिसरात दहशत तयार झाली आहे.
हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....