PHOTO : शुभम शेतात टोमॅटो खुडत होता...आणि दहा फूट अंतरावरच 'तो' दबा धरून होता

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

परमोरी येथील कंपनीजवळील शेतात शुभमचे आई व वडील राजेंद्र टोमॅटो खुडत असताना, त्यांच्यापासून अवघ्या दहा फूट अंतरावर शेतात बिबट्या दबा धरून बसला होता. बिबट्याने शुभमच्या मानेला चावा घेतला व सुमारे 31 फूट ओढत नेले. आई व वडिलांनी मुलाला सोडविण्यासाठी धाव घेतल्याने बिबट्याने त्याला सोडले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने त्यास गंभीर जखमी केले होते. परमोरी येथील ही पाचवी घटना असून, यापूर्वी दोन मृत, तीन जखमी झाले आहेत.

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात परमोरी (ता. लखमापूर)येथील पाचवीत शिक्षण घेणारा शुभम राजेंद्र काळोगे (वय 11) गंभीर जखमी झाला असून, त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिसरातील नागरिक मात्र धास्तावले आहेत. वनविभागाने त्वरित यावर मार्ग शोधावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Image may contain: 1 person, child

परमोरी येथील बिबट्या हल्ल्याची ही पाचवी घटना 
परमोरी येथील कंपनीजवळील शेतात शुभमचे आई व वडील राजेंद्र टोमॅटो खुडत असताना, त्यांच्यापासून अवघ्या दहा फूट अंतरावर शेतात बिबट्या दबा धरून बसला होता. बिबट्याने शुभमच्या मानेला चावा घेतला व सुमारे 31 फूट ओढत नेले. आई व वडिलांनी मुलाला सोडविण्यासाठी धाव घेतल्याने बिबट्याने त्याला सोडले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने त्यास गंभीर जखमी केले होते. परमोरी येथील ही पाचवी घटना असून, यापूर्वी दोन मृत, तीन जखमी झाले आहेत. याच ठिकाणी चार ते पाच महिन्यांपूर्वी चार बिबट्यांची पिल्ले मृत अवस्थेत आढळली होती. परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. 

No photo description available.

तत्काळ कार्यवाही करून बिबट्याला जेरबंद करावे.
परिसरात बिबट्याची मृत पिल्ले आढळल्यापासून घटनास्थळी पिंजरा लावला आहे, पण त्यात सावज नसल्याने बिबट्या येत नाही. वन विभागाच्या भोंगळ कामामुळे बिबट्या नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. तत्काळ कार्यवाही करून बिबट्याला जेरबंद करावे-पप्पू शिवले, ग्रामपंचायत सदस्य, परमोरी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard terror on student at Nashik parmori