अंधा-या गावात बिबट्याची दहशत..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील सिंगलफेज ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे हे गाव अंधारात असून, वीज वितरण कंपनी वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली केलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल डोंगर असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत गावात बिबट्या शिरण्याचा घटना रोजच घडत आहेत.

मालेगाव :  बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील सिंगलफेज ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे हे गाव अंधारात असून, वीज वितरण कंपनी वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली केलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल डोंगर असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत गावात बिबट्या शिरण्याचा घटना रोजच घडत असून बिबट्याने गेल्या आठ दिवसात २ बक-या फस्त केल्या आहेत. हा आदिवासी भाग असल्यामुळे विषारी सरपटणारे प्राणी आदींचा वावर या भागात सुरू असतो. तसेच अशा परिस्थितीत सध्या पावसाळ्याच्या दिवसात विजेअभावी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर केरोसिन बंद झाल्यामुळे घरात दिवा लावणे ही अशक्य गोष्ट होत आहे.

लवकरात लवकर नवीन ट्रांसफार्मर बसवावा : ग्रामस्थांची मागणी
गावात मात्र अंधाराचे साम्राज्य असून गावातील सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज ही विजेभावी ठप्प झाले आहेत तसेच याचा परिणाम शाळा व शाळकरी विद्यार्थ्यांवरही पडत असून शाळकरी विद्यार्थ्याच्या अभ्यासाला देखील याचा फटका बसत आहे. तसेच मोबाईल चार्जिंग साठी सुद्धा गावातील ग्रामस्थांना मळ्यात जाऊन चार्जिंग करावे लागत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने गावात लवकरात लवकर नवीन ट्रांसफार्मर बसवावा अशी मागणी माजी सरपंच गंगाराम पवार सदस्य दत्तू पवार, चंद्रजी पवार, रमेश पवार, सुभाष पवार, दिलीप पवार, बाजीराव पवार, चैत्राम पवार, बाळू गांगुर्डे,लक्ष्मण गांगुर्डे, धुवळु बैरम, आदी ग्रामस्थांनी केली आहे

तक्रार केल्यावर मिळत आहेत उडवाउडवीचे उत्तर
पठावे दिगर येथील ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या जोरण येथील कार्यालयात जाऊन तक्रार केली. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले व ट्रांसफार्मर (गड्डा) शिल्लक नाही .जेव्हा भेटेल तेव्हा बघू अशा उर्मट भाषेत उत्तर दिले. तसेच काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तेव्हाही अधिकाऱ्यांनी उर्मट भाषेत ग्रामस्थांना उत्तरे देण्यात आली.

प्रतिक्रिया
"आठ दिवसापासून गाव अंधारात आहे आम्ही वायरमन तसेच कार्यालयातील वरिष्ठांना माहिती दिली पण सर्व ठिकाणाहून आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत -गंगाराम पवार, ग्रामस्थ 

"दर आठ-दहा दिवसात तेथील ट्रांसफार्मर खराब होत असून कारण गावात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते.आणि त्यातच फॉल्ट करून ट्रांसफार्मर खराब होत आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत तरी लवकरात लवकर पठावे दिगर येथे ट्रांसफार्मर करून देण्यात येईल - एस.के.सवंद्रे, कनिष्ठ अभियंता जोरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard terror in a village