
ऊसतोड सुरु असतांना पिल्लांचा बारीकसा आवाज ऐकू आल्यानंतर थोड्याच वेळात ऊसामध्ये बिबट्या मादीने नुकत्याच पिल्लांना जन्म दिला असल्याचे कामगारांच्या लक्षात आले.त्यानंतर लगेचच बिथरलेल्या मादी बिबट्याने पिल्लांच्या संरक्षणासाठी कामगारावर हल्ला चढवला.
नाशिक : नांदुरवैद्य येथे ऊसाच्या शेतात नुकताच पिल्लांना जन्म दिलेल्या बिबट्या मादीने ऊसतोड कामगारावर हल्ला केला असून त्यात तो किरकोळ जखमी झाला आहे. कामगारांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या मादी ऊसात पळून गेली आहे. अधिक वृत्त असे की नांदुरवैद्य येथील ज्ञानेश्वर मुसळे यांच्या शेतातील ऊसतोड सुरु आहे.सकाळी ऊसतोड सुरु असतांना पिल्लांचा बारीकसा आवाज ऐकू आल्यानंतर थोड्याच वेळात ऊसामध्ये बिबट्या मादीने नुकत्याच पिल्लांना जन्म दिला असल्याचे कामगारांच्या लक्षात आले.त्यानंतर लगेचच बिथरलेल्या मादी बिबट्याने पिल्लांच्या संरक्षणासाठी कामगारावर हल्ला चढवला.
मादी बिबट्याचा ऊसतोड कामगारावर हल्ला...
त्यावेळी इतर कामगारांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या घाबरून पळून गेला. त्यात कामगार अगदी किरकोळ जखमी झाला आहे. सदर घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनपाल शैलेंद्र झुटे घटनास्थळी दाखल झाले. ऊसात नुकत्याच जन्मलेल्या बिबट्याच्या पिल्लांचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पिल्ले आहे याचा अर्थ बिबट्याही ऊसातच असणार याची कल्पना आल्याने त्यांनी फटाके वाजवले तसेच डब्बे वाजवून आरडाओरडा केला.मात्र बिबट्या मादी काही निदर्शनास आली नाही. केवळ बिबटयाच्या असल्याच्या सुगाव्याने नागरिकांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांचीही ऊसात शिरण्याची हिम्मत झाली नाही.
हेही वाचा > काय मनात आले त्याच्या..की सप्तश्रृंगीच्या शीतकड्यावरून उडी घेतली
खबरदारी म्हणून ऊसतोड तूर्तास बंद
केवळ खबरदारी म्हणून ऊसतोड तूर्तास बंद करण्यात आली असून दोन-तीन दिवसात पिल्लांनी डोळे उघडल्यानंतर बिबट्या मादी कदाचित ठिकाण बदलू शकते अन्यथा वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंजराही लावण्यात येणार असल्याची माहिती वनपाल झुटे यांनी दिली.यावेळी बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी बघ्यांनी खूप गर्दी केली होती मात्र पिल्ले न बघताच केवळ आवाज ऐकूनच सर्वांना माघारी फिरावे लागले.
वाचा सविस्तर > ड्रायव्हर तर त्या मुलींना धडक देऊन निघून गेला...पण नंतर