जामदा परिसरात पुन्हा दोन वारसांचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीती

दीपक कच्छवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) - गिरणा पट्ट्यात बिबट्याकडून गुरांवर होणारे हल्ल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहेत. जामदा (ता. चाळीसगाव) येथे बिबट्याने दोन वासरांचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन
विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे ठेवले जात असून त्यात बिबट्या येत नसल्याने वन विभागाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत.

मेहुणबारे (चाळीसगाव) - गिरणा पट्ट्यात बिबट्याकडून गुरांवर होणारे हल्ल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहेत. जामदा (ता. चाळीसगाव) येथे बिबट्याने दोन वासरांचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन
विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे ठेवले जात असून त्यात बिबट्या येत नसल्याने वन विभागाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत.

लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथील गोपाळ पाटील यांच्या शेतात बिबट्याने वासराचा फडशा पडल्याच्या घटनेला 24 तास होत नाही नाहीत, तोच जामदा शिवारातील शायसिंग महाले यांच्या शेतात बिबट्याने दोन लहान वासरांचा फडशा पाडला. बिबट्याने वासरांचा गळ्याच्या भागाचे रक्त पिऊन मांस खाल्ले. आज सकाळी शायसिंग महाले हे शेताकडे गेले असता, वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना कळताच त्यांनी वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक अजय महिरे, बाळू शितोळे, संजय गायकवाड, श्रीराम राजपूत यांना पाठवून पंचनामा केला.जामदा येथे हल्ला केलेल्या ठिकाणी रात्री उशिरापर्यत वन विभागातर्फे पिंजरा लावण्याचे काम सुरू होते.

दिवसाआड गुरांचा बळी सुमारे तीन महिन्यांपासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एका दिवसाआड एका पशुधनाचा बळी बिबट्या घेत आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मात्र, बिबट्या जेरबंद होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. या घटनांमुळे वडगाव लांबे व जामदा परिसरातील पशुधन मालक चिंताग्रस्त झाले आहेत. अगोदरच पावसाअभावी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यात बिबट्याकडून होणारे हल्ले थांबता थांबत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असता, मात्र काही ग्रामस्थांच्या चुकीमुळे तो निसटला.

असा आहे बिबट्याचा मार्ग गुरांवर हल्ले करणारा बिबट्या सध्या गिरणा नदीचा परिसर लाभलेल्या ऋषिपांथा, बोरखेडा शिवार तेथून रहिपुरी, लांबे वडगाव, दसेगाव, उंबरखेडे याच भागात फिरत आहे.त्यात सर्वाधिक हल्ले वडगाव शिवारात झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.ठिकठिकाणी ठेवलेल्या पिंजऱ्यांपैकी कुठे तरी बिबट्या जेरबंद होईल,असा वन विभागाला विश्‍वास आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.सध्या पाच ठिकाणी पिंजरे लावले आहेत. वडगाव परिसरात पुन्हा "ट्रॅप कॅमेरा' लावण्यात आला आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या सुमारास शेताकडे जाण्याचे टाळावे.
पिंजरा ठेवलेल्या परिसरात फिरु नये.
- संजय मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopards attack continues in jamdaha