आम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..

yeola
yeola

येवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली आहे.आमच्या गावातील परिस्थिती कठीण असल्याने आमचाही दुष्काळी गावात समावेश करावा या मागणीसाठी आज साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन करीत शासनाचा तिव्र निषेध केला.

साताळीसह १७ टंचाईग्रस्त गावे दुष्काळ यादीतून वगळल्याने फार मोठा अन्याय शासनाने या गावांवर केला .दुष्काळी गावांना मिळणा-या सवलतीपासून सर्व शेतकरी शेतमजुरी वंचित राहणार असल्याने या गाव परिसरात तिव्र असंतोष आहे.शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करताना या दुष्काळी तालुक्यातील काही गावांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. शहरात पाऊस पडतो मात्र हा लहरी पाऊस शहराच्या दिड किमी परिसरात देखील पडत नाही त्यात १७ गावे येवला मंडळामध्ये येत असल्याने आणि मंडळनिहाय दुष्काळ याद्या जाहिर केल्याने या गावावर अन्याय झाला आहे.

शासनाने तात्काळ या गावाची पहाणी करावी व या गावांचा दुष्काळ यादीत समावेश करावा या एकाच मागणीसाठी राज्य शेतकरी पंचायतीचे राज्य संघटक अर्जुन कोकाटे यांचे नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर दोन तास धरणे धरण्यात आले.त्यानंतर तहसीलदार देवीदास वारूळे यांना निवेदन देण्यात आले.१७ गावांचा तात्काळ समावेश करावा अन्यथा सर्व शेतकरी शेतमजुर व ग्रामस्थ एकत्र येऊन शासनाच्या या सापत्न भाव वागणूकीविरूद्ध तिव्र आंदोलन छेडतील असे निवेदनात म्हटले आहे.या धरणे आंदोलनात अर्जुन कोकाटे,पुंजाराम काळे, भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव काळे, कचरू आहेर,भाऊसाहेब कोकाटे, जालिंदर कोकाटे, दादाभाऊ सोनवणे ,बाळासाहेब कोकाटे, साहेबराव कोकाटे, शरद काळे, अमोल सोनवणे,तुषार सोनवणे, दशरथ जाधव, मच्छिंद्र कोकाटे, बबन काळे, रामदास कोकाटे, दत्तु काळे आदि सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com