दुहेरी हत्याकांडप्रकरणी 12 आरोपींना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नाशिक - शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या युवकांचे अपहरण करून निर्दयपणे खून केल्याप्रकरणी आज गुन्ह्यातील मुख्य आरोपी पाप्पा ऊर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह अकरा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेसह या आरोपींना न्यायालयाने एकत्रित एक कोटी 34 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. एकुण 24 आरोपी असलेल्या गुन्ह्यातील 12 संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मृत प्रवीण गोंदकर आणि त्याचा मित्र रचित पाटणी यांचे 14 व 15 जून 2011 खंडणी प्रकरणातून अपहरण झाले होते.

नाशिक - शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या युवकांचे अपहरण करून निर्दयपणे खून केल्याप्रकरणी आज गुन्ह्यातील मुख्य आरोपी पाप्पा ऊर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह अकरा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेसह या आरोपींना न्यायालयाने एकत्रित एक कोटी 34 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. एकुण 24 आरोपी असलेल्या गुन्ह्यातील 12 संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मृत प्रवीण गोंदकर आणि त्याचा मित्र रचित पाटणी यांचे 14 व 15 जून 2011 खंडणी प्रकरणातून अपहरण झाले होते. मुख्य आरोपी पाप्पा उर्फ सलीम ख्वाजा शेख याने त्याच्या साथीदारांसह दोघांना बेदम मारहाण करत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले होते. या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीनी दहशत माजविण्यासाठी दोघांचे नग्नावस्थेतील मृतदेह शिर्डीतील हॉटेल पुष्पांजली जवळ टाकून दिले. अतिशय निर्दयीपणे खून झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शिर्डीसह राज्यात खळबळ उडाली होती. 

Web Title: Life imprisonment for 12 accused in twin murders

टॅग्स