
Dhule : शिंदखेड्यात दारुचा कारखाना उध्वस्त; एलसीबीची कारवाई
धुळे/चिमठाणे : शहरातील देवपूरमधील तरुणाने शिंदखेडा तालुक्यात सुरु केलेल्या बनावट दारुच्या (Fake Liquor) कारखान्यावर एलसीबीच्या (LCB) पथकाने छापा टाकत एक लाख ३६ हजाराचा साठा जप्त (Seized) केला आहे. तसेच संशयित तरुणासह साथीदाराला अटक केली. त्यांना दोंडाईचा न्यायालयाने कामकाजानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. (Liquor factory destroyed in Shindkhed LCB action Dhule Latest Crime News)
शेवाळे (ता. शिंदखेडा) शिवारातील एका शेतात पवन सुदाम कोळी (वय १९, रा. शेवाळे) हा साथीदाराच्या मदतीने बनावट दारुचा कारखाना चालवत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. याआधारे निरीक्षक पाटील यांनी पथकाला कारवाईची सूचना दिली. पथकाने शेवाळे शिवारातील दारु कारखान्यावर छापा टाकला. संशयित कोळी व साथीदार योगेंद्र किशोर सोनवणे (वय २४, रा. प्लॉट नं. ३६, घुगे नगर, देवपूर, धुळे) बनावट दारु तयार करताना आढळले.
त्यांच्याकडून ८० हजार ६४० किमतीची देशी दारु, तीन हजार किमतीच्या हजार रिकाम्या बाटल्या, पंधरा हजार किमतीचे बूच पॅकींगचे मशिन, अडीच हजार किमतीचे पाच प्लास्टिक ड्रम, दोन हजार किमतीचे पिवळ्या रंगाचे अल्कोहोल मिटर, दोन हजार ७२० किमतीचा दारु बनविण्याचा सेंट, बूच, टाकी, स्ट्रे, गाळणी, नळ्या, दोन मोबाईल आणि विना नंबरची दुचाकी, असा एक लाख ३६ हजाराचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
हेही वाचा: Dhule : घराची भिंत कोसळली; महिला जखमी
पोलिस कर्मचारी किशोर पाटील यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक अधिकारी प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, धनंजय मोरे, हवालदार संजय पाटील, प्रकाश सोनार, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा: जरीफबाबा खून प्रकरण : वाहनचालकासह तिघांना मुंबईतून अटक
Web Title: Liquor Factory Destroyed In Shindkhed Lcb Action Dhule Latest Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..