"एलएलबी' प्रवेशाच्या अर्जाची 31 पर्यंत मुदत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नाशिक - कुठल्याही शाखेतून पदवी शिक्षण घेणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांकरीता तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट असून, त्यासाठी 19 सप्टेबरपर्यंत मुदत दिली आहे. 

राज्यातील अकरा विद्यापीठांमधधील 13 हजार 840 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विविध पदवी शिक्षणक्रमाच्या प्रवेशाची मुदत अंतिम टप्यात असताना, विधी शाखेच्या या अभ्यासक्रमाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे. त्यातच जात वैधता प्रमाणपत्राची अट घातल्याने प्रवेशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. 

सद्यःस्थितीत जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार, 8 ऑगस्टला प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तर त्यावर हरकती नोंदविण्यासाठी 9 ते 13 ऑगस्टदरम्यान मुदत असेल. अंतिम गुणवत्ता यादी 23 ऑगस्टला जाहीर होणार आहे. यानंतर पहिली निवड यादी 30 ऑगस्टला जाहीर होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 31 ऑगस्ट ते 5 सप्टेबरपर्यंत मुदत असेल. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी 14 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 15 ते 19 सप्टेबरपर्यंत मुदत असेल. दोन फेऱ्यांनंतर सीईटीत पात्र ठरलेले व ऑनलाइन अर्ज केलेले विद्यार्थी रिक्‍त जागांचा अंदाज घेत महाविद्यालयात प्रवेशासाठी नव्याने प्राधान्यक्रम दाखल करू शकतील. त्यासाठी 22 ते 27 सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. यानंतर तिसरी निवड यादी 10 ऑक्‍टोबरला जाहीर होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 11 ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान प्रवेशाची मुदत असेल. 

Web Title: LLB admission till 31 July