भारनियमनाने काढला मोखाडा वासियांचा घामटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मोखाडा - मोखाड्यात 15 ऑक्टोबर पासून रोज साडेआठ तास भारनियमन महावितरणाने सुरू केले आहे. त्यामुळे विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर पंख्याची भिरभिर ऐन ऑक्टोबर हीटमध्ये थांबल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. रॉकेलही मिळत नसल्याने, घरात गोडेतेलाची पणती लाऊन आदिवासींना रात्रीचे जेवण करावे लागत आहे. 24 तास विजेची घोषणा करणार्‍या, भाजप सरकारचे हेच का अच्छे दिन! असा संतप्त सवाल आदिवासींनी ऊपस्थित केला आहे. 

सुमारे 86 हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात, महावितरणचे 9 हजारांहून अधिक कुटुंब ग्राहक आहेत. ऐन ऑक्टोबर हीटमध्ये वाढलेली विजेची मागणी आणि दगडी कोळश्याच्या तुटवड्याचे कारण पुढे करून, महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. मात्र, अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रात्री 9 :30 वाजेपर्यंत साडे आठ तासांचे भारनियमन टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोखाड्यातील खेड्यापाड्यांमधील आदिवासींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. मोदी सरकारने आदिवासी कुटुंबांना गॅस देऊन, त्यांना रॉकेल देणे बंद केले आहे. या भागात संध्याकाळी 7 ते  8 च्या दरम्यान थकून भागून आलेला आदिवासी जेवण करतो. आणि त्याच वेळात घरातील विजेचे दिवे, भारनियमनामुळे बंद असतात. तर खेडोपाडी गॅस वितरण योजना राबविली जात असल्याने, ज्यांच्या कडे गॅस सुविधा आहे. त्यांना शासनाने रॉकेल देणे बंद केले आहे. त्यामुळे आदिवासींना रात्री जेवणाच्या वेळी गोडेतेलाचे दिवे लाऊन जेवण करावे लागते आहे.

भारनियमनामुळे विजेवर चालणारे सर्व व्यवसाय तसेच बँकांचे व्यवहार ही बंद पडत आहेत. त्यामुळे त्याचा मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो आहे. भारनियमनाव्यतिरिक्त विजेचा लपंडाव सुरूच आहे. तर सर्वच भागात कमी दाबाने होत आहे. सर्वच स्तरातील नागरिकांना भारनियमनामुळे त्रस्त केले आहे.

Web Title: load shading in mokhada