महाराष्ट्र अंधारात! महावितरणकडून भारनियमचं वेळापत्रक जाहीर

supply cut off
supply cut offesakal

नाशिक : प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा जेंव्हा मागणी जास्त असते तेव्हा वीज टंचाई निर्माण होते. तेंव्हा वीजेचे उत्पादन व पुरवठ्याचा मेळ साधण्यासाठी वीजेचे भारनियमन (load shedding) केले जाते. काही क्षेत्रात मग वीज पुरवठा बंद करण्यात येतो. येथे 'मागणी तसा पुरवठा' हे वाणीज्यिक सूत्र कुचकामी ठरते. (Maharashtra Load Shedding)

राज्य सरकारच्या मुख्य अभियंत्यांनी भारनियमाची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार दिवसऊर आठ तास किंवा रात्रीच्या आठ तासांची वेळ निश्चित करण्यात आलीय. यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढण्यात आलं आहे.

राज्यात भारनियमन पुन्हा वाढले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विजेची मागणी ३० हजार मेगॉवटपर्यत पोहोचणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भारनियमनाचे नियोजन सुरू झाले आहे. पुढील दीड- दोन महिन्यात भारनियमनाचा कडाका आणखी वाढणार आहे. राज्यात सध्या विजेची मागणी २८ हजाराच्या आसपास आहे. काही दिवसांपासून उन्हाचा कडाका आणखी वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी पुढील काही दिवसांत ३० हजार मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.

supply cut off
राज्यपाल कोश्यारी अन् पालकमंत्री भुजबळांमध्ये रंगली जुगलबंदी

राज्यातील भारनियमनाच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाची बैठक झाली. विशेष म्हणजे भारनियमन या एकमेव विषयावर बैठक होऊन त्यात, पुढील काळात विजेची मागणी ३० हजार मेगावॅटपर्यत वाढणार असल्याने बाहेरून वीज घ्यावी लागणार आहे.

मात्र या वाढत्या भारनियमनाचा बोजा उद्योग व्यवसायावर टाकला जाणार नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली, असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले.

supply cut off
नाशिकच्या सांस्कृतिक उत्थानावर चर्चा गरजेची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com