मैत्रीत ५० लाखांचे कर्ज काढून दिल्याने वाद

Crime
Crime

जळगाव - एक अभियंत्याचा अन्‌ दुसरा बॅंक कर्मचाऱ्याचा मुलगा. दोघांमध्ये चांगली मैत्री. या मैत्रीतून एकाने दुसऱ्यासाठी काकाचे घर तारण ठेवून कर्ज मिळवून दिले. मात्र, कर्ज न फेडता आल्याने मैत्रीत दरी निर्माण होऊन तेथूनच वाद वाढला. आणि आज अखेर हा वाद दोघांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल होऊन पोलिस ठाण्यापर्यंत गेला. हिंदी सिनेमात शोभेल, अशी ही स्टोरी.. 

सेवानिवृत्त अभियंता रवींद्र मोरे यांचा मुलगा तेजस आणि युको बॅंकेचे कर्मचारी विलास शांताराम आळंदे यांचा मुलगा स्वप्नील या मित्रांच्या व्यवहारातून वाद होऊन प्रकरण चिघळले आहे. मैत्रीखातर तेजसच्या व्यवसायासाठी स्वप्नीलने काकाचे घर गहाण ठेवून कर्ज मिळवून दिले. मात्र, ते कर्ज न फेडता तेजसने बॅंकेचा चेक बाऊन्स केला. पैशांची मागणी केल्यावर वाद, धमकीचा प्रकार घडल्याच्या परस्पराविरुद्ध तक्रारी आहेत. 

रवींद्र मोरेंची तक्रार...
रवींद्र मधुकर मोरे (वय ६८, रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांचा मुलगा तेजस याला व्यवसायासाठी पैशांची गरज भासत होती. म्हणून त्याने मित्र स्वप्नील आळंदे याच्या माध्यमातून विलास शांताराम आळंदे यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले होते. ही रक्कम नंतर त्याने परत केली असतानाही विलास आळंदे याने १३ सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास रवींद्र मोरे यांच्या घरी येऊन ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चापटाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी मोरे यांच्या तक्रारीवरून विलास आळंदे, स्वप्नील विलास आळंदे, निखिल विलास आळंदे, अनिल विलास आळंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com