"चर्मकार' कर्जाच्या चौकशीसाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

जुने नाशिक - सामाजिक न्याय विभागातील कर्ज गैरव्यवहारप्रकरणी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत या खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समिती नियुक्तीचे आदेश दिले. या संदर्भात मंगळवारी (ता. 27) मंत्रालयात बैठक होत आहे.

जुने नाशिक - सामाजिक न्याय विभागातील कर्ज गैरव्यवहारप्रकरणी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत या खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समिती नियुक्तीचे आदेश दिले. या संदर्भात मंगळवारी (ता. 27) मंत्रालयात बैठक होत आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या चर्मकार व अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत मागास प्रवर्गातील गरजूंना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणाऱ्या कर्जासाठी बनावट कागदपत्रांच्या साह्याने कर्ज काढून विठ्ठल कचरे या ज्येष्ठाची फसवणूक केल्याचे प्रकरण "सकाळ'ने उघडकीस आणले होते. छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात राज्यमंत्री कांबळे यांची भेट घेऊन "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रण, तसेच कर्ज गैरव्यवहाराची माहिती दिली. त्याची दखल घेत कांबळे यांनी विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचा आदेश दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी समिती तयार करावी व त्यात छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी करावी. गैरव्यवहार झालेल्या काळातील अधिकारी मुंबई कार्यालयात असल्याने त्यांच्याकडून कागदपत्रांत फेरफार होण्याची शक्‍यता असल्याने चौकशीसंदर्भातील कोणतीही कागदपत्रे संबंधित कार्यालयात न पाठविण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

एका एजंटने जिजा वाघ (रा. सिडको) यांना स्वयंरोजगारासाठी चर्मकार महामंडळामार्फत 25 हजारांचे कर्ज मिळवून दिले होते. या महिलेने कर्जफेड केली नसल्याने थकीत रकमेच्या वसुलीसाठी कर्जदार महिला व जामीनदार म्हणून नाव देण्यात आलेल्या विठ्ठल कचरे या ज्येष्ठाला नोटीस बजावण्यात येऊन त्यांच्या शेतीवर सरकारचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

Web Title: Loan scam Department of Social Justice