आश्वी - रयत शिक्षण संस्थेच्या संतप्त विद्यार्थ्यांनी  कार्यालयाला ठोकले कुलूप 

आनंद गायकवाड
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आश्वी - संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थी संतप्त, कार्यालयाला कुलूप ठोकले. प्रशासनाच्या विरोधात घोषणांनी दणाणले गाव व परिसर. हातात फलक घेत पालक व विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक मुरलीधर बापूजी वलवे यांची संस्थेच्या आदेशाप्रमाणे काल ( ता. 01 ) रोजी अकोले तालुक्यातील कोतुळच्या संस्थेत बदली करण्यात आली. या मुळे विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी संतप्त झाले असून, कालपासून त्यांनी विद्यालयाचे कामकाज बंद पाडले आहे. या विद्यालयात सुमारे 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1975 साली स्थापन झालेल्या या विद्यालयातील शिक्षक वलवे यांनी चांगल्या कामामुळे सर्वांचे मन जिंकले आहे.

आज विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून या घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी भोसले मॅडम यांना निवेदन दिले असून, या शिक्षकांची बदली रद्द होत नाही तो पर्यंत शाळा उघडू न देण्याचा निर्णय व्यक्त केला आहे.

Web Title: Lodged to the office by the angry students of Ashti-Rayat Shikshan Sanstha