लोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

जळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला. 
न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात काल दुपारी सव्वाबाराला निकालाच्या सुनावणीस सुरवात झाली. आरोपी मनोज लोहार, धीरज येवले, आरोपींच्या पिंजऱ्यात उभे होते. यानंतर मनोज लोहार पिंजऱ्याच्या बाहेर येऊन बसून होते. तर धीरज येवले शेवटपर्यंत कठड्यातच होता. 

जळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला. 
न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात काल दुपारी सव्वाबाराला निकालाच्या सुनावणीस सुरवात झाली. आरोपी मनोज लोहार, धीरज येवले, आरोपींच्या पिंजऱ्यात उभे होते. यानंतर मनोज लोहार पिंजऱ्याच्या बाहेर येऊन बसून होते. तर धीरज येवले शेवटपर्यंत कठड्यातच होता. 

न्यायाधीशांनी शिक्षेबाबत लोहार यास विचारले असता तो म्हणाला, साहेब मला हार्टचा त्रास आहे, कॅन्सर आहे. मला दोन मुले आहेत, वृद्ध आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे मला कमी शिक्षा द्या. नंतर धीरज येवले यास विचारले असता त्याने ढसाढसा रडायला सुरवात केली. त्यास पाणी द्या. बसून घ्या. असे न्यायालयाने सांगितले. रडक्‍या आवाजात येवले म्हणाला मला पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी सामान्य माणूस असल्याचे त्याने सांगितले. 

निकालाबाबत समाधानी
फिर्यादी उत्तमराव महाजन निकालाबाबत म्हणाले, तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी प्रकरणाची दखल घेतली होती. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन खटल्याचे कामकाज झाले. दरम्यानच्या काळात माझे राजकीय तसेच वैयक्तिक नुकसान झाले. दोघांना मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेबद्दल मी समाधानी आहे. तिसऱ्या दोषमुक्त झालेल्या विश्‍वास निंबाळकराबद्दल माझ्या वकिलांशी बोलून निर्णय घेईल.

लोहार, येवलेच्या नातेवाइकांची गर्दी
न्यायालयाच्या आवारात लोहार व येवले याचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. त्यामुळे न्यायालयाच्या बाहेर गर्दी होती. तसेच लोहार याचे दोन भाऊ व मित्रपरिवार होते. तर येवलेच्या जवळचे समजले जाणारे एक राजकीय पदाधिकारी देखील तळ ठोकून होते. 

वडापाव, कचोरी खाल्ली
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयीन कागदपत्रांचे काम सुरू असताना कोर्टाच्या बाजूला लोहार यांना बसविण्यात आले होते. यावेळी लोहार याच्या मित्रांनी त्यास वडापाव, कचोरी खाण्यासाठी आणून दिल्यावर वडापाव व कचोरीवर ताव मारला.

लोहारांनी विचारला न्यायाधीशांनाच प्रश्‍न
न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर न्यायाधीश लाडेकर कोर्टरूमच्या बाहेर जात होते. त्यावेळी मनोज लोहार याने न्यायाधीशांना इंग्रजीतून ‘सर तुम्ही कोठून वकिलाची पदवी मिळवली, तेव्हा लाडीकर  म्हणाले, अकोला येथून. यावर लोहार पुन्हा म्हणाला, मी मुंबई विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतली आहे. अकोला येथून नवीन काही शिकायला मिळते का? असा प्रश्‍न केला. यावर न्यायाधीश लाडेकर उत्तर न देता निघून गेले.

डॉ. उत्तम महाजन यांना खंडणी मागत डांबून ठेवल्या प्रकरणी मनोज लोहार व धीरज येवले यास दोषी ठरवले होते. त्यांना कलम ३६४ अ मध्ये दोघांना सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सोळा जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. 
- केतन ढाके, विशेष सरकारी वकील

१६ जणांचे साक्षी पुरावे ग्राह्य 
या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात फिर्यादी डॉ. उत्तमराव महाजन, मनोज महाजन, डॉ. महाजन यांचे सासरे पांडुरंग माळी, तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी, या खटल्याला मंजुरी देणारे गृहविभागाचे अवर सचिव देशमुख व लिपिक नितीन जाधव यांच्यासह १६ जणांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्याचप्रमाणे आरोपींमधील फोन रेकॉर्डिंग, तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी चौकशीनंतर पोलिस महासंचालकांकडे लोहार यांचा पाठविलेला प्रस्ताव अशाप्रकारे साक्षी व पुरावे ग्राह्य धरून न्या. पी. वाय लाडेकर यांनी लोहार व येवले या दोघांना शिक्षा सुनावली.

Web Title: Lohar said punishment less