नाशिकला लोकअदालतीत पाचशे प्रकरणे निकाली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

"हाच नवरा पाहिजे' 
कौटुंबिक न्यायालयात शंभरावर प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी चार प्रकरणांत महिलांनी पतीबरोबर राहण्याचे पसंत केल्याने त्या न्यायालयातून सरळ नांदायला गेल्या. याशिवाय अकरा प्रकरणांत यशस्वी तडजोड करण्यात आली. न्यायालयाचा परिसर पती-पत्नी आणि मुलांनी गजबजून गेला होता.

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीस पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा न्यायालयात विविध प्रकारची पाचशेवर प्रकरणे निकाली काढण्यात आली. 

जिल्हा न्यायालयात विविध प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तेरा पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. सकाळी साडेदहाला पक्षकारांच्या हस्ते आज लोकन्यायालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. सकाळपासूनच जिल्हा न्यायालयात पक्षकारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत दहा हजार पाचशे प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात सर्वांत जास्त प्रतिसाद मोटार वाहन अपघात नुकसानभरपाईच्या प्रकरणात मिळाला. सुमारे दीडशे पक्षकारांना या वेळी रक्कम निश्‍चित करण्यात आली. धनादेश न वटल्याच्या प्रकरणातही तडजोड करण्यात आली. 

"हाच नवरा पाहिजे' 
कौटुंबिक न्यायालयात शंभरावर प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी चार प्रकरणांत महिलांनी पतीबरोबर राहण्याचे पसंत केल्याने त्या न्यायालयातून सरळ नांदायला गेल्या. याशिवाय अकरा प्रकरणांत यशस्वी तडजोड करण्यात आली. न्यायालयाचा परिसर पती-पत्नी आणि मुलांनी गजबजून गेला होता.

Web Title: Lok aadalat removed five hundred cases in Nashik