Loksabha 2019 : भाजप-शिवसेना मेळाव्यात राडा; गिरीश महाजनांना धक्काबुक्की

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 एप्रिल 2019

गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना सुरक्षा कवच देत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यासपीठाखाली उतरवले. या राड्यानंतर डॉ. पाटील व्यासपीठावर मागच्या बाजूला जाऊन बसले. गिरीश महाजन यांनी माईकचा ताबा घेत हा मारहाणीचा अड्डा नाही, असे म्हणत मारहाण व घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली. त्यानंतर स्मिता वाघ यांनीही माइकवरून कार्यकर्त्यांना शांत राहाण्याचे आवाहन केले. काही वेळेनंतर मेळाव्यास सुरवात झाली. 

अमळनेर : भाजप-शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचा आज प्रताप मिल कंपाउंडमध्ये मेळावा झाला. मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचे रूपांतर मारहाणीत झाले. डॉ. पाटील यांना वाघ यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामुळे मेळाव्यास गालबोट लागले असून, राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

मेळावा सुरू होण्यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह विविध पदाधिकारी आल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर व्यासपीठावर आल्यानंतर स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेत डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरविण्याची मागणी केली. या मागणीनंतर डॉ. पाटील यांच्या शेजारी बसलेले उदय वाघ यांनी उठून डॉ. पाटील यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना सुरक्षा कवच देत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यासपीठाखाली उतरवले. या राड्यानंतर डॉ. पाटील व्यासपीठावर मागच्या बाजूला जाऊन बसले. गिरीश महाजन यांनी माईकचा ताबा घेत हा मारहाणीचा अड्डा नाही, असे म्हणत मारहाण व घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली. त्यानंतर स्मिता वाघ यांनीही माइकवरून कार्यकर्त्यांना शांत राहाण्याचे आवाहन केले. काही वेळेनंतर मेळाव्यास सुरवात झाली. 

भाजपचे विद्यमान अध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार सौ.स्मिता वाघ यांना भाजपच्या लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. त्यानीं अर्जही भरला होता. त्यावेळी नाराज झालेले विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार बी.एस.पाटील उपस्थित होते.त्यांनी स्मिता वाघ यांच्या उमेवारीला विरोध करीत जिल्हा उदय वाघ यांच्यावर टिका केली
 
Web Title: Lok Sabha 2019 Girish Mahajan caught in clash between BJP workers at a rally in Amalner