निवडणुकांसाठी शिवसेनेशी युतीचा प्रयत्न - रावसाहेब दानवे

raosaheb danve
raosaheb danve

धुळे - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युतीचा, तसेच समविचारी, किमान समान कार्यक्रमाच्या आधारे एकत्र येणाऱ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात कुणीही एकत्र यावे. त्यांनी आम्हाला पराभूत करण्याची भाषा केली तरी पक्षीय संघटनात्मक, रचनात्मक काम व विकासाचा मुद्दा लक्षात घेतला तर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे व्यक्त केला.  

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी श्री. दानवे येथे सायंकाळी सहानंतर उपस्थित झाले. पत्रकार परिषदेत विविध प्रश्‍नांवर ते म्हणाले, की आतापर्यंत राज्यातील ४८ पैकी ३६ लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला असून पक्षीय संघटनात्मक, रचनात्मक कामकाजाचा आढावा घेतला आहे. बुथ आणि पन्नाप्रमुखांचे काम पाहून समाधानी आहे. केंद्र व राज्य सरकारने आपापल्या स्तरावरून विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मेट्रो, विमानतळ, महामार्गांचा विकास, जलयुक्त शिवार अभियानाव्दारे सिंचनवृद्धी, दुष्काळी व नैसर्गिक स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहाणे, शेती कर्जमाफी देणे, खतपुरवठा यासह विकासाच्या विविध योजनांच्या आधारे निवडणुकीला सामोरे जाऊ. त्यावरून मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, हा विश्‍वास आहे. 

जागा मागणीचा प्रस्ताव नाही
भाजप, शिवसेना व समविचारी पक्षांची युती झाली, तर मतांचे विभाजन टळेल आणि काँग्रेस आघाडीला लाभ होणार नाही. त्यासाठी युतीचा प्रयत्न आहे. मात्र, यासंदर्भात जागा मागणीचा कुठलाही प्रस्ताव अन्य पक्षांकडून अद्याप भाजपला प्राप्त झालेला नाही. भाजपच्या लोकप्रतिनिधींचे काम समाधानकारक आहे किंवा नाही याचे मूल्यमापन मुख्यमंत्री करतील, मी संघटनात्मक कामकाजावर जोर देत असतो. त्यात आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया भाजपच्या ध्येयधोरणानुसार होईल, असे श्री. दानवे यांनी नमूद केले.

आमदार गोटेंवर कारवाई नाही
धुळे महापालिकेच्या निवडणुकीतील नेतृत्वावरून बंडखोरी करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही, असे श्री. दानवे यांनी स्पष्ट करत लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे होणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com