गिर्यारोहण करू या... नैसर्गिक लोणारचे 

डॉ. विलास नारखेडे, जळगाव 
मंगळवार, 17 जानेवारी 2017

निसर्गकन्या बहिणाबाई यांना निसर्गातच भगवतगीता व पुराण दिसत असे. त्यांनी नद्या, पर्वत, डोंगर व निसर्ग यावरच काव्य व प्रेम केले. त्याचप्रमाणे आपणासाठी जगण्याचा सूर, ताल हा निसर्ग व गिर्यारोहणाच्या छंदात जीवनाच गमक आढळत. असेच एक आनंदाचे पाऊल लोणार या नैसर्गिक भागाचेही गिर्यारोहण करून आपणही साहस व निसर्ग हाच ध्यास, गिरीदूर्ग, हिमशिखरे हे सगेसोयरे व सह्याद्री, सातपुडा हाच श्‍वास माना.... 

निसर्गकन्या बहिणाबाई यांना निसर्गातच भगवतगीता व पुराण दिसत असे. त्यांनी नद्या, पर्वत, डोंगर व निसर्ग यावरच काव्य व प्रेम केले. त्याचप्रमाणे आपणासाठी जगण्याचा सूर, ताल हा निसर्ग व गिर्यारोहणाच्या छंदात जीवनाच गमक आढळत. असेच एक आनंदाचे पाऊल लोणार या नैसर्गिक भागाचेही गिर्यारोहण करून आपणही साहस व निसर्ग हाच ध्यास, गिरीदूर्ग, हिमशिखरे हे सगेसोयरे व सह्याद्री, सातपुडा हाच श्‍वास माना.... 

लोणार परिसराचे गिर्यारोहण 
लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर. सहा ते सात किमीचा परिघ आणि सरोवरापर्यंत पोहोचताना गिर्यारोहण करत असताना शारीरिक क्षमतांचा कस लागतो. छातीत श्‍वास जोरजोरात वाढु लागतो. चालताना थकवा येतो, पाणी वारंवार प्यावे लागते. परिसरातही दगड-धोंडे, असलेला चढ उताराचा भाग आहे. तेथेही गिर्यारोहण करता येते. सर्व परिसर झाडा झुडपांनी वेढलेला आहे. 

वन्यजीव अभयारण्याचे गिर्यारोहण 
लागूनच 384 हेक्‍टर क्षेत्रात अभयारण्य पसरलेले असून येथेही गिर्यारोहण करता येते. त्यात 75 जातीचे पक्षी आहेत. चिंकारा, लांडगा, तडस, कोल्हे, धीरपुड, मुंगसे, साप, माकड इत्यादी प्राणीसंपदा येथे आहे. 

इतिहास 
ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्‍झांडर यांनी 1823 मध्ये या सरोवराचा शोध लावला. आईना-ए- अकबरी, स्कंध पुराण, पद्‌मपुराणासारख्या प्राचीन ग्रंथातही लोणार व परिसराचा संदर्भ सापडतो. बेसॉल्ट खडकात म्हणजे काळ्या दगडात आकार घेतलेले हे जगातील मोठे विवर आहे. 

इतर अद्‌भुत ठिकाणे 
खारट पाण्याचे लोणार सरोवर, महादेवाचे प्राचिन मंदिर, सीता न्हाणी, चुंबकीय हनुमान मूर्ती, दैत्यसुदन मंदिर, (स्थापत्य शैलीचा अद्‌भूत नमुना), 1878 मधील भस्म टेकडी, (उंच टेकडी) पावलो पावली पुरातन दगड, मूर्ती (ब्रह्मदेव, विष्णू, गरूड), गोमुख धार, अंबरतले, पापाराधार, देवगीरी कालातील शीलालेख इत्यादी बाबी. 

जाण्याचा कालावधी :  सप्टेबर ते एप्रिल पर्यंत 

लोणारची लांबी-रूंदी : सरोवराचा व्यास जवळपास 1600 मी. आहे. खोली 150 मी. कमाल खोली, 500 मीटर. पाण्यापासून कडांची उंची 137 मीटर व संपूर्ण परिसर 7 किमी लांबीचा आहे. 

कसे जाल : लोणार हे बुलडाणा जिल्ह्यात असून तेथून 79 किमी लोणार आहे. जवळच जालना रेल्वे स्थानक 90 किमी. इतके आहे. शेगाव येथुन 100 किमीवर आहे. 

निवास :  पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह, हॉटेल्स येथे उपलब्ध आहेत. डॉरमेंटरी, अत्याधुनिक भोजन कक्ष, राहण्यास स्वतंत्र खोल्या आहेत. 

गाईड :  लोणार दर्शनासाठी गाईड उपलब्ध आहे. पर्यटन मंडळाच्या संकेत स्थळावरून निवास व्यवस्था व गाईड बुक करता येतो. 

वैशिष्ट्ये
- लोणार सरोवर एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर एककोडं आहे. 
- चुंबकीय हनुमान मूर्ती आहे. 
- अननस व पपईचे चिप्स हा नैसर्गिक नाश्‍ता येथे मिळतो. 
- येथील शिल्पकलेचे नमुने डोळ्यांचे पारणे फेडतात. 
- चंद्र व मंगळावरील विवरांचे लोणार विवराशी संबंध आहेत. 
- नासा, इस्त्रोसह जगभरातील अनेक संशोधकांनी याचा अभ्यास केला आहे. 
- भगवान विष्णूची मुर्ती अत्यंत सुंदर आहे. 
- खाऱ्या सरोवराजवळच लागुन अखंड पाणी सुरू असलेली गोमुख संतत धार येथे गोड पाणी आहे. 
 

Web Title: lonar lake