लोंढे रस्ता बनला मृत्यूचा सापळा 

दीपक कच्छवा
रविवार, 8 जुलै 2018

वरखेडे ते लोंढे हा चार किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात नित्याचे झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता एकप्रकारे मृत्यूचा सापळा बनला आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 
 

मेहुणबारे (चाळीसगाव) - वरखेडे ते लोंढे हा चार किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात नित्याचे झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता एकप्रकारे मृत्यूचा सापळा बनला आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

वरखेडे- लोंढे रस्त्यावरून वाचन चालविताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या वरखेडेतील जिल्हा बँकेची शाखा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना लोंढे येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेत जावे लागते. मध्यंतरी रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र, ते काम निकृष्ट झाल्याने पुन्हा "जैसे थे' परिस्थिती झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहने नेहमीच पंक्‍चर होतात. या रस्त्यालगत वरखेडे गावापासून जवळच लोंढे रस्ता सुरू होतो. तेथे जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे पाणी तुंबल्याने खड्डा तयार झाला आहे. येथून वाहन काढणे अवघड होत आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

झुडपे तोडण्याची मागणी 
वरखेडे- लोंढे रस्त्यादरम्यान नवेगावपर्यंत दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे, समोरून येणारे वाहन दिसत नाही. ज्यामुळे लहान- मोठे अपघात होतात. त्यामुळे धोकादायक ठरणारी झुडपे तातडीने तोडावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: londhe road are in bad condition