सिलिंडर पोचवणाऱ्याची लूटमार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

नाशिक - विडीकामगार नगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलिंडर पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची ऍपेरिक्षा अडवून, विशेष भरारी पथक असल्याची बतावणी केली आणि त्यास मारहाण करून त्याच्याकडील रोकडीसह प्रकरण मिटविण्यासाठी एक लाखाच्या खंडणीची मागणी केली. त्यापोटी आणलेले 40 हजार हजार रुपये घेऊन पसार होणाऱ्या पाच संशयितांना आडगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. दोघे फरार झाले असून आडगाव पोलिसात दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मुंबईचे असून, ते सराईत गुन्हेगार असण्याची शक्‍यता आहे.

मिलिंद मारुती जोंधळे हे पंचवटीतील एका गॅस वितरकाचे सिलिंडर पोच करण्याचे काम करतात. रविवारी सकाळी तो ऍपेरिक्षातून विडीकामगार नगरमधील तुळशी कॉलनीकडे सिलिंडर देण्यासाठी जात होता. त्याचवेळी एका कारने त्याची ऍपेरिक्षा अडविली. कारमधून संशयित संजय मुकुंद चौघुले (वय 34), रामचंद्र साहेबराव शिंदे (वय 36), आसिफ खान (वय 32), राजेश घनश्‍याम लाख (वय 42), अजगर खान (वय 42) व अन्य दोघे असे सात जण एकापाठोपाठ उतरले आणि त्यांनी "आम्ही अवैध गॅस व गुटखा विक्री विरोधी कारवाई करणारे मुंबईचे विशेष पथक असल्याचे सांगत, तुझ्या रिक्षातील गॅस सिलिंडर अवैधरीरत्या आहेत. त्यामुळे तुझ्यावर गुन्हा दाखल करावे लागेल अशी धमकी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loot crime